‘माझा होशील ना’ मधील आदित्यची आई आहे ही सुंदर अभिनेत्री.. नाव ऐकून थक्क व्हाल..

मराठी चित्रपट सृष्टीला बॉलिवूड मध्ये मानाचे स्थान आहे. याचे कारण म्हणजे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीने बॉलिवूडला अनेक अजरामर कलाकार दिले आहेत. मग ते पडद्यावरचे कलाकार असोत किंवा पडद्याआडचे. मराठी चित्रपट सृष्टी प्रमाणेच मराठी टेलिव्हिजन जगताचीही देशपातळीवर दखल घेतली जाते.

झी मराठी आणि मराठी माणूस यांच्यात एक अतूट नातं आहे. झी मराठी वर अश्या अनेक सीरिअल्स आल्या आहेत ज्या संपून एक मोठा काळ उलगडला तरीही अजूनही त्या प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा भाग नुकताच संपला. ही मालिका अतिशय प्रसिद्ध झाली ती अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या गाजलेल्या लव्ह स्टोरीमुळे.

त्यानंतर आता अशीच एक आगळीवेगळी लव्ह स्टोरी घेऊन झी मराठी पुन्हा एकदा सज्ज आहे. झी मराठी वरील आणखी एक नुकतीच प्रदर्शित झालेली मालिका ‘माझा होशील ना’ ही हळू हळू प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. त्यामुळे ही मालिका प्रचंड गाजत आहे. तसेल मालिकेतील कलाकारांची देखील सर्वत्र चर्चा होत आहे.

माझा होशील ना… या मालिकेतील नायक आणि नायिका दोघे देखील प्रेक्षकांना भावत आहेत. या मालिकेतील नायिका ही गौतमी देशपांडे असून ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने याआधी सोनी मराठीच्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत काम केले होते.

या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. माझा होशील ना… या मालिकेतील नायक तर मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा आहे. 

माझा होशील ना… या मालिकेतील नायकाचे नाव विराजस कुलकर्णी असून तो प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने हॉस्टेल डेज या चित्रपटात काम केले होते. त्याच्या या कामाची मोठ्या प्रमाणात स्तुती झाली होती. आणि त्याच्याच जोरावर त्याला झी ने संधी देण्याचे ठरवले

माझा होशील ना? मालिकेत आदित्यची भूमिका साकारणाऱ्या विराजसची खऱ्या आयुष्यातील आईचे नाव आहे मृणाल कुलकर्णी. एके काळी मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीने आपल्या सोंदर्याने सर्वच स्तराच्या प्रेक्षकांना भुरळ घातली होती. तसेच, मृणालने अशा काही मालिकेत काम केले होते जे प्रेक्षकांना आजही स्मरणात असतील.

स्टार प्लस वाहिनीवर सण 2000 मध्ये सोनपरी नामक एक मालिका सुरू झाली होती. या मालिकेत मृणाल ने सोनपरीची भूमिका साकारली होती. राजा शिवछत्रपती, अवंतिका, दौपदी या मालिकेत देखील मृणाल आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. तसेच मृणाल ने मेड इन चायना, लेकर हम दीवाना दील अशा काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

मृणाल ने फतेशिकस्त, फर्जंद, रमा माधव, येल्लो, बबन अशा काही गाजलेल्या मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारल्या आहेत. तसेच, तिने प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. विराजस हा जरी मृणाल कुलकर्णीचा मुलगा असला तरी अभिनयाचा वारसा त्याने स्वबळावर पुढे नेला आहे.

माझा होशील ना… या मालिकेत विराजस आणि गौतमीसोबतच विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.