आधीच 2 लग्न झालेला दिग्दर्शक ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्नाला झाला तयार, हे ‘2 मोठे’ आहेत लग्नाचं कारण…

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेचा भाग बनलेला असतो असतो. आणि जर बॉलिवूड मधील च दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले असतील तर अशा वेळी ते बातमीपत्रात थेट हेडलाईन गाठतात.अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकारांमधील नात्यांची चर्चा नेहमीच होत असते.

बॉलिवुडमध्ये सध्या कार्यरत असलेल्या अभिनेत्र्यांपैकी सर्वगुणसंपन्न अशी एक अभिनेत्री म्हणुन विद्या बालन प्रसिद्ध आहे. विद्या बालनने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत व प्रत्येक चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिच्या मेहनतीचं फळ तिला कायम मिळालं आहे आणि तिचे जवळपास सर्वच चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाले आहेत.

एवढेच नव्हे तर विद्या बालन ही फक्त भारतातच प्रसिद्ध नसून, देशा विदेशात तिचे चाहते आहेत. पण विद्याच्या अनेक चाहत्यांचं हृदय तर तेव्हा तुटलं जेव्हा त्यांना कळालं की विद्या विवाहीत आहे. विद्या बालन आता ४२ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म १९७९ साली मुंबईत झाला. अगदी लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती.

विद्याचे लग्न हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपुर यांच्या सोबत झाले आहे. 14 डिसेंबर २०१२ रोजी विद्याने सिद्धार्थ सोबत लग्न केले होते. त्यांचे लग्न मुंबइतील ग्रीन गिफ्ट या प्रायव्हेट हॉटेल मध्ये झाले होते. हे लग्न अतिशय साध्य पद्धतीने करण्यात आले होते. ज्यात या दोघांच्या परिवारातील काही माणसं आणि त्यांच्या जवळील मित्रपरिवार एवढेच लोक उपस्थित होते.

त्यांच्या लग्नात बॉलिवूड मधील देखील अतिशय निवडक व्यक्तींना बोलावण्यात आले होते जे दोघांच्या अगदी जवळचे असतील. विद्या आणि सिद्धार्थची पहिली ओळख फिल्मफेअर अवॉर्ड शोच्या बॅकस्टेजला झाली होती. हे दोघे करण जोहरचे कॉमन मित्र असल्यामुळे त्यानंतर करण जोहरने पुन्हा या दोघांची भेट घडवुन आणली.

या दोघांची पहिल्यांदा भेट होण्या पुर्वी दोघेही फिल्मइंडस्ट्रीमध्ये खुप प्रसिद्ध होते. दोघेही एकमेकांना ओळखत तर होते परंतु एकमेकांना जाणून घेण्याची संधी मात्र अजून नव्हती मिळाली. त्यामुळे हळुहळु त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. दोघांनमध्ये चांगलीच मैत्री जमली. हळूहळू मैत्री चे रूपांतर प्रेमात झाले.

दोघे अनेक कार्यक्रमात आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसू लागले. दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली. त्यानंतर एके दिवशी सिद्धार्थने विद्याला लग्नाची मागणी घातली. विद्या ला ही सिद्धार्थ वर प्रेम जडले असल्याने तिने होकार दिला आणि मग परिवाराच्या संमतीने या दोघांनी तमिळ आणि पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केले.

परंतु एक गोष्ट खूप कमी लोकांना माहित आहे की विद्या बालन ही सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी आहे. सिद्धार्थने पहिले लग्न त्यांची बालमैत्रिण आरती बजाज सोबत केले. तिच्यापासुन सिद्धार्थला एक मुलगा आहे. त्यानंतर सिद्धार्थने दुसरे लग्न टिव्ही प्रोड्युसर कवितासोबत केले मात्र ते लग्न जास्त काळ टिकु शकले नाही.

विद्याने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला की, जेव्हा ती सिद्धार्थच्या प्रेमात पडली तेव्हा तिला कळालं की खरं प्रेम काय असतं. ती पुढे म्हणाली की मी जितका विचार केला होता त्याहुन कित्येकपटीने सुंदर प्रेम मला मिळाले.जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो तेव्हा त्या व्यक्तीने जर कुठल्याही अटी किंवा कंडीशन्स न घालता आपल्याला एक्सेप्ट करणे हे खरेच स्वप्नवत आहे.

सिद्धार्थ रॉय़ कपुर हे सध्या वॉल्ट डिज्नी इंडीयाचे मॅनिजींग डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईतील सिड्नम कॉलेज मधुन कॉमर्स विभागातुन शिक्षण घेतले आहे. त्यानंतर जमनालाल बजाज इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट स्टडीज मधुन एमबीएचे शिक्षण घेतले. त्यांचे दोन्ही लहान भाऊ, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल रॉय कपूर हे दोघे बॉलिवुड कलाकार आहे.