हातात झाडू पकडलेली ही चिमुकली आहे तरी कोण ?, मराठीसह बॉलिवूडमध्ये आहे तिचा बोलबाला

वैदही परशुरामीने आपल्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. वैदहीने तिच्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत वैदही हातात झाडू पकडली आहे. या फोटोला, ‘हे असे घडते जेव्हा तुम्ही लहानपणापासून स्वछता प्रिय असता’ असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

या फोटोत तिने फ्रॉक घेतलेला आहे. वैदहीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. डॉ. काशीनाथ घाणेकर’ चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे.

वैदेहीने ‘वेड लागी जीवा’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते. रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती ‘वजीर’ सिनेमातही झळकली होती.