मुंबईच्या रस्त्यावर फक्त ‘ब्रा-टॉप’ मध्ये वडापाव खाताना दिसली अभिनेत्री.. लोकांच्या नजरा मात्र तिच्या..

बिग बॉस ओटीटी स्पर्धक उर्फी जावेद आपल्या लूकसाठी दररोज चर्चेत असतो. तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाइलमुळे उर्फी जावेदला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. पण अभिनेत्रीने या गोष्टीबद्दल अनेकदा बोलताना सांगितले आहे की, तिला ट्रोलिंग आणि नकारात्मक कमेंट्सने काहीही फरक पडत नाही. ती दररोज तिच्या कपड्यांवर प्रयोग करत असते, त्यामुळे ती लोकांच्या चर्चेचा विषय बनते.

एअरपोर्टवर अतिशय विचित्र लूकमध्ये दिसल्यानंतर उर्फी जावेद लोकप्रिय झाली, तेव्हापासून ती तिच्या नवीन ड्रेसेजमध्ये दिसत आहे. अलीकडेच, अभिनेत्री अशा पोशाखात दिसली, ज्यामुळे सोशल मीडियावर तिची खूप खिल्ली उडवली गेली.

गुरुवारी, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती रुमालापेक्षा लहान अशा हिरव्या ब्रा टॉपमध्ये दिसत आहे. तिने या टॉपसोबत तपकिरी रंगाची पँट घातली आहे. या आउटफिटसोबत तिने एक विचित्र हेअरस्टाईल केली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शन दिले की, ‘तुम्हाला कोण आवडते आणि कोणाला नाही याची काळजी का? मला स्वतःलाही मी आवडत नाही.

या व्हिडिओसोबतच सोशल मीडियावर आणखी काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती मुंबईच्या रस्त्यावर वडा पाव खाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हातात वडा पाव घेत आहे आणि खात एका बिल्डिंगमध्ये शिरल्याचे दिसत आहे. 

यानंतर ती पोज देऊन पुन्हा वडा पाव खाताना दिसत आहे. उर्फी जावेदच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मला दीदीची फॅशन समजत नाही’, तर एका यूजरने लिहिले की, ‘RIP ड्रेसिंग सेन्स’.

बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या उर्फी जावेदने एक वादग्रस्त विधान केले आहे. मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी इस्लाम किंवा इतर कोणत्याही धर्माचे पालन करत नाही, असे वक्तव्य उर्फी केले आहे.

उर्फीने एका मुलाखतीत सांगितले, ‘मी एक मुस्लिम मुलगी आहे. माझ्या प्रत्येक पोस्टवर घाणेरड्या कमेंट करणारे हे अर्धे मुस्लिम लोक असतात. त्यांना असे वाटते की मी इस्लामची प्रतिमा मलिन करत आहे. त्यांना माझा प्रचंड राग येतो कारण मुस्लिम पुरुषांना त्यांच्या घरातील महिलांनी एका विशिष्ट प्रकारे व्यवहार करावा, असे वाटते. ते समाजातील सर्व महिलांना नियंत्रित करु इच्छितात. त्यामुळे मी इस्लामला मानत नाही.’