पडद्यावर आदर्श सून म्हणून वावरणाऱ्या या अभिनेत्रीच्या प्रत्यक्षात मात्र संसाराचे वाटोळे.. अनेकदा लग्न करूनही नाही मिळालं ‘ते’ सुख..

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने लवकरात लवकर लग्न करून कौटुंबिक जीवनाची सुरुवात करावी. अनेक जण प्रेमाच्या बंधनात अडकतात आणि पुढे त्याच व्यक्ती सोबत विवाह करून संसार थाटतात. परंतु सर्वांच्याच नशिबी हे सुख असतेच असे नाही. बर्‍याच वेळा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर लोक प्रेम करून बसतात आणि मग त्याच व्यक्तीसोबत लग्न करायच्या आग्रहामुळे ते अविवाहित राहण्याची देखील वेळ येऊ शकते.

त्याच वेळी, असे काही लोक आहेत जे लग्नासाठी त्यांच्या खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात, आणि त्यांना पाहिजे तास साथीदार मिळतो सुद्धा. पण नंतर दोघांमध्ये वा-दविवा-द होऊन त्यांना वेगळं व्हावं लागतं. अशा लोकांचं लग्न करून छानसं कुटुंब सुरू करण्याचं स्वप्न अधुरेच राहते.

सर्वसामान्य व्यक्तीच नव्हे तर बॉलिवूड मध्ये देखील अशा अनेक अभिनेत्र्या आहेत ज्या पडद्यावर तर आदर्श सून म्हणून वावरत आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांचा संसार काही टिकत नाहीयेत . आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.

जेव्हा दोन लोक विवाहित जीवनात प्रवेश करतात तेंव्हा दोघांमधील प्रेम, बॉन्डिंग आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीलासोबत मिळून सामोरे जावे लागते. जीवनात कितीही अडचणी आल्यातरी एकमेकांना साथ देणार अशी वचने देण्यात येतात मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडताना दिसत नाही.

टीव्ही पडद्यावर आदर्श बहु म्हणून घेणाऱ्या अनेक अभिनेत्रींची खऱ्या आयुष्यात लग्न टिकत नाहीत. रोजचे भां-ड-णे, किटकिट यापेक्षा हे घटस्फो-ट घेऊन वेगळे होण्यावर टीव्ही हिरोईन्स जास्त भर देताना दिसत आहेत. यामध्ये अशा किती अभिनेत्री आहे की, त्यांचे पहिले लग्न टिकले नाहीत हे आपण बघणार आहोत. यामध्ये टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कडचे लग्न 2013 मध्ये रौनक सॅमसनशी झाले होते, जो पेशाने पायलट होता. मात्र, यांचे लग्न काही जास्त काळ टिकू शकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फो-ट झाला त्यानंतर दीपिकाने शोएब इब्राहिमसोबत लग्न करून आपला संसार परत एकदा थाटला आहे.

’राहुल दुल्हनिया ले जाएंगे’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राहुल महाजनने कलकत्ताच्या डिंपी गांगुलीसोबत लग्न केले होते. त्यानंतर डिंपीने राहुलवर घरगुती हिं-साचाराचा आरोप केला होता. राहुल आणि डिंपीचे लग्न 2010 मध्ये झाले होते तर 2015 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर डिंपीने तिचा शाळेतील मित्र रोहित रॉयशी लग्न केले. काम्या पंजाबीने 2020 साली 10 फेब्रुवारीला दिल्लीतील व्यावसायिका शलभ दांगशी लग्न केले. काम्या आणि शलभ दांग हे त्यांच्या विवाहित जीवनात बरेच आनंदी आहेत, परंतू ज्यावेळी काम्या पंजाबी शलभ दांगशी लग्न करत होती त्यावेळी सोशल मीडियावर काम्यावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात येत होती.

लोकांचे म्हणणे होते की, एक मुलगी असताना हिला लग्न करण्याची काय गरज आहे. मात्र, अशाप्रकारची टिका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत काम्याने शलभ दांगशी लग्न केले. एका मुलाखतीत काम्या ने सांगितले होते की शलभ सोबत लग्न करणे हा तिच्या आयुष्यातील खूप मोठा निर्णय होता आणि ती त्याबाबत खूप खुश आहे.

राम कपूर आणि त्यांची पत्नी गौतमी गाडगीळ ही चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. राम कपूर आणि गौतमी यांनी टीव्ही सीरियल ‘घर एक मंदिर’ मध्ये एकत्र काम केले होते आणि या शोमध्ये काम करत असताना दोघांनाही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, या दोघांचे लग्न होण्याच्या अगोदर गौतमी गाडगीचे एका व्यावसायिका सोबत लग्न झाले होते. परंतू ते जास्त काळ टिकू शकले नाही.