बारीक होण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया या अभिनेत्रीला पडली महागात, वयाच्या ३१व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

तेलगू सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आरती अग्रवाल हिने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती. तिचा चिरंजिवीसोबतचा इंद्रा द टायगर हा चित्रपट हिट ठरला होता. २०१५ साली या अभिनेत्रीचं नि-धन झाल्याचं कळताच सगळ्यांना धक्का बसला होता. बारीक होण्याच्या नादात आरती अग्रवालने जीव गमावला आहे. 

अभिनेत्री आरती अगरवालचा लिपोसक्शन नावाच्या श’स्त्रक्रियेनंतर मृ-त्यू झाला होता. या श’स्त्र-क्रियेसाठी ती अमेरिकेतील न्यू जर्सी इथल्या खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. श’स्त्रक्रियेनंतर काही तासात तिची तब्येत बिघडली होती. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृ-त्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

अवघ्या ३१ व्या वर्षी या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. आरतीने अमेरिकेत ही श’स्त्रक्रिया करण्यापूर्वी हैदराबाद इथल्या डॉक्टरांकडे या श’स्त्रक्रियेबाबत विचारले होते. ही श’स्त्रक्रिया तुझ्या जीवावर बेतू शकते असे सांगत या डॉक्टरांनी तिला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. ही शस्त्रक्रिया करू नकोस तुझ्या त्वचेखाली चरबी नाही आहे, असे या डॉक्टरांनी तिला सांगितले होते.

आरती अग्रवालने चित्रपटसृष्टीत टीकायचे असेल तर आपल्याला बारीक व्हावे लागेल असे मनाशी ठरवले होते. मात्र यासाठी तिने व्यायामाचा कठीण मार्ग निवडण्याऐवजी श’स्त्रक्रियेचा मार्ग निवडला असा तिच्यावर आरोप होतो.

जाड असल्यामुळे आरतीला चित्रपट मिळणे कमी झाले होते, यामुळे ती तणावाखाली होती. २००८ साली तिला फक्त ४ चित्रपट मिळाले होते. त्यामुळे आरतीने शरीरातील अतिरिक्त चरबी हटवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिला श’स्त्रक्रिया खूप महागात पडली.

आरतीने २००१ मध्ये नव्वू नकू नाचव (Nuvvu Naaku Nachav) या तेलगू सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. इंद्रा (Indra) आणि वसंथम (Vasantham) या सिनेमातील आरतीच्या भूमिका सिनेप्रेमींच्या लक्षात राहिल्या. सिनेसृष्टीत यशस्वी होत असतानाच प्रेमात अपयशी ठरल्यामुळे आरतीने २००५ मध्ये आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

सहकलाकार तरुणने दिलेला नकार पचवू न शकल्याने आरतीने टोकाचे पाऊल उचलले होते. यथावकाश धक्क्यातून सावरलेल्या आरतीने तब्बल २५ सिनेमांतून काम केले. अलिकडेच आरतीचा राणम २ (Ranam 2) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता

.