अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कॅमेऱ्यासमोर का काढले कपडे?, अंगावरील एक-एक कपडा काढतांनाचा..

मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की.

दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहेत. पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे.

सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे.’रानबाजार’ या सीरिजचा टीझर तेजस्विनी पंडितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.  यात तेजस्विनी तिचे कपडे काढताना दिसते आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सुरू असल्याचं ऐकू येतं.

हा टीझर शेअर करताना तेजस्विनीने “एकदा लोकांची सेवा करून पाहिली…एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला..एकदा बदलाही घेतला..! आता मात्र फसत चाललीय…सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’ट्रेलर येतोय 18 मे ला!” असे कॅप्शन दिलंय

या वेबसिरीजमध्ये तेजस्विनी पंडितसह प्राजक्ता माळीही आव्हानात्मक भूमिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसिरीजची प्रतीक्षा आहे, ही मराठी इंडस्ट्रीतील आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज ठरेल असं बोललं जातंय