भन्नाट कल्पना ! त्या शेतकऱ्याने चक्क सनी लिओनीचं बिकिनी पोस्टर लावले शेतात, कारण जाणून तुम्ही थक्क व्हाल

काहीही म्हणा.., अजूनही काही लोक सनी लिओनीला (Sunny Leone) पॉर्न स्टार म्हणून हिणवत असले तरी, तिच्यावर प्रेम करणारेही कमी नाहीत. म्हणूनच या ना त्या कारणाने सनीची चर्चा होत राहते. आता तर दूर आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यात सनीची चर्चा होतेय. होय, कारणही तसंच खास आहे. येथील एका 45 वर्षीय शेतक-याच्या शेतात सनीची दोन बोल्ड पोस्टर्स सध्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतंय.

माध्यमांमध्येही या पोस्टर्सची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियावरही या पोस्टरचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या पोस्टरमध्ये सनी लिओनी लाल रंगाच्या बिकिनीत आहे. सगळ्यात खास आहे ते या पोस्टरवर लिहिलेली ओळ. होय, सनीच्या या हॉट पोस्टरवर तेलगू भाषेत काही तरी लिहिले आहे. ‘माझ्यासाठी रडू नका आणि माझा मत्सर पण करु नका’, अशी ही ओळही लक्षवेधी आहे.

आता शेतात या भल्यामोठ्या सनीच्या पोस्टरचा आणि त्या ओळीचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर संबंध आहे. पहिली गोष्ट म्हणजे, शेतात ही पोस्टर झळकवणारा 45 वर्षीय शेतकरी ए चेंचू रेड्डी सनी लिओनीचा खूप मोठा चहता आहे. याशिवाय, ही पोस्टर लावण्यामागे आणखी एक कारण त्यानं दिलंय. शेतातील पिकाला दृष्ट लोकांची नजर लागू नये म्हणून त्याच्या सुपीक डोक्यातून ही सुपीक कल्पना समोर आलीये.

सनी लिओनीचे पोस्टर पाहून लोकांची नजर माझ्या पिकांकडे नाही तर या पोस्टरकडे जाईल, असं त्याचं म्हणणं आहे. एकंदर लोकांची दिशाभूल करण्यासाठी म्हणून त्यानं सनीची ही पोस्टर्स शेतात लावली आहेत. तो म्हणतो, माझ्याकडे 10 एकर शेती आहे. यावर्षी शेतात सोन्यासारखं पिक झालंय. माझ्या शेतातील पिक पाहून लोक माझा हेवा करू लागले आहेत. येणारा जाणारा प्रत्येकजण माझ्या पिकांकडे बघतो. त्याचीच चर्चा करतो.

या लोकांपासून माझ्या पिकाला कोणाची नजर लागू नये म्हणून मी सनी लिओनीचं मोठं पोस्टर शेतामध्ये लावलं आणि माझी युक्ती यशस्वीही झाली. आता लोक माझ्या पिकाकडं नाही तर सनीच्या पोस्टरकडं बघतात. आहे ना भन्नाट…!!