सर्वांचा आवडता कॉमेडिअन डॉक्टर गुलाटी याची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे इतकी सुंदर.. बॉलिवूड अभिनेत्र्याही तिच्यासमोर फेल..

आपल्या सर्वोत्कृष्ट कॉमेडीद्वारे प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा सुप्रसिद्ध कॉमेडियन सुलिन ग्रोव्हर बर्‍याचदा चर्चेत राहतो. आतापर्यंत बर्‍याच चित्रपटात दिसलेल्या सुनील ग्रोव्हरने विनोदी जगतात मोठे नाव कमावले आहे. कपिल शर्माच्या शोमधून त्याला उत्तम यश आणि प्रसिद्धी मिळाली आहे. आज सुनील ग्रोव्हरची फॅन फॉलोव्हिंग बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.

सुनील ग्रोव्हर नेहमीच आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना गुदगुल्या करतो. कपिल शर्माच्या शो मध्ये कधी गुत्थी, कधी डॉक्टर मशहुर गुलाटी तर कधी रिंकू भाभी बनून त्याने आपल्या भूमिका पार पाडल्या. डॉक्टर मशहुर गुलाटी तर त्याच्या नावाप्रमाणेच अगदी प्रसिद्ध झाले.

डॉक्टर मशहूर गुलाटी बनून, सुनील ग्रोव्हरने प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर आणि अमिट छाप सोडली आहे. सुनील ग्रोव्हर बद्दल बर्‍याचदा चर्चा होत राहते, पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत. आज आपण त्याच्या सुंदर पत्नीबद्दलही जाणून घेऊयात.

सुनील ग्रोवर यांचा जन्म 3 मार्च 1977 रोजी हरियाणाच्या मंडी डबवाली येथे झाला. सुनीलने 1998 साली आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटात तो दिसला होता. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अजय देवगण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

सुनील ग्रोव्हरने आरती ग्रोव्हरशी लग्न केले. सुनील ग्रोव्हरची पत्नी आरती लाइम लाइटपासून दूर आहे. ती सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या दुनियेपासून दूर आरामशीर आणि साधे सरळ जीवन जगते. बॉलिवूड जगताशी तिचा काही एक संबंध नाही आहे

छायाचित्रांमध्ये तुम्ही पाहु शकता की सुनीलची पत्नी आरती खूपच सुंदर दिसत आहे. ती तिच्या सौंदर्याने बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना देखील टक्कर देते. जरी आरतीला हेडलाइन्समध्ये रहायला आवडत नसेल, पण तिला पाहून प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो. तीचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सुनील ग्रोव्हरने आपल्या सर्वोत्कृष्ट कॉमेडीसाठी नाव कमावले आहे, तर त्यांची पत्नी आरती ग्रोव्हर ही पेशाने इंटिरियर डिझायनर आहेत. सुनील आणि आरती यांनाही मोहन नावाचा मुलगा आहे. दोघेही अनेक वर्षांपासून अगदी सुखाने संसार करत आहेत.

सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. अधूनमधून तिथे तो पत्नी आणि मुलाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत राहतो. इंस्टाग्रामवर सुनीलची चांगली फॅन फॉलोइंग आहे. त्याला इन्स्टाग्रामवर तब्बल 42 लाख लोक फॉलो करत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर सुनील ग्रोव्हर कपिल शर्मा या शोसोबतच इतरही अनेक शोचा एक भाग आहे. अलीकडेच ‘तांडव’ या वेब सीरिजमध्ये सुनील ग्रोव्हर दिसला होता, यामध्ये अभिनेता सैफ अली खानने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.