जेव्हा बाळासाहेबांच्या एका पत्राने झाली होती स्वतःला किंग खान समजणाऱ्या शाहरुखची हवा टाईट..

‘बॉलीवूड’ हा आपल्या सर्व भारतीय सिनेरसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे भारतात बॉलिवूड आणि त्यासंबंधीत सर्वच गोष्टी नेहमीच चर्चेत राहतात. तसाच एक चर्चेचा विषय म्हणजे बॉलीवूड मध्ये होणाऱ्या पार्ट्या.

कुणाचा वाढदिवस, अँनिवर्सरी असो किंवा एखाद्या चित्रपटाला मिळालेलं यश, अशा वेळेस अशा पार्ट्या हमखास आयोजित केल्या जातात. अश्या पार्ट्यांमध्ये दा-रुचे ही सेवन केले जाते. त्यामुळे अनेकदा या पार्ट्या बातमी पत्राच्या हेडलाईन बनतात. त्यामुळे अशा पार्ट्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

बॉलिवूड मध्ये होणाऱ्या पार्ट्यांमध्ये आयोजकाच्या जवळचे सर्वच मित्र मंडळी शामिल होताना दिसून येतात. त्यामुळे अनेक कलाकार एका ठिकाणी एकत्र आल्याने मीडिया देखील दखल घेते. आज आपण अशा एका पार्टी मध्ये झालेला एक किस्सा सांगणार आहोत ज्या मध्ये खुद्द बाळासाहेब ठाकरे आणि किंग खान शाहरुख समोरासमोर आले होते.

बॉलिवूडच्या दिग्गज 3 खान्सपैकी एक शाहरूख खान बॉलीवूडचा किंग आहे. त्याने स्वतःच्या हिमतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शाहरुख खान हा फक्त एक अभिनेता नसून तो स्वतः एक ब्रँड आहे. स्वतः ची ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी शाहरुख खान नेहमी प्रयत्न करत असतो.

काही वर्षांपूर्वी एका आयपीएल सामन्या दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियम वर शाहरुख चे एका सुरक्षारक्षकासोबत झालेले भांडण तर आपणा सर्वांना माहीतच आहे. परंतु एक सुरक्षारक्षका सोबत वादात पडण्याची शाहरुखची ही काही पहिली वेळ नव्हती. या आधीही एका पार्टीमध्ये असा किस्सा झालेला आहे.

हा किस्सा आहे ११ जानेवारी १९९७ चा. दिग्दर्शक फिरोज नाडीयडवाला यांनी त्यांचा नवीन येणार चित्रपट ‘रफतार’साठी एका प्रमोशनल पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी मुंबईच्या ओबेरॉय टॉवरमध्ये होती. या पार्टीमध्ये मुंबईतील अनेक मोठी मोठी माणसे आली होती. त्यासोबतच बॉलीवूडमधले अनेक दिग्गज कलाकार देखील उपस्थित होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पार्टीमध्ये एरव्ही अश्या पार्ट्यांमध्ये सहभागी न होनार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे देखील आले होते. साजिद नाडीयाडवाला यांच्या सोबतच्या मैत्री पोटी बाळासाहेबांना यावं लागलं होतं. शाहरुख खानला देखील या पार्टीमध्ये बोलवण्यात आले होते.

शाहरुख खानची जेव्हा या पार्टीमध्ये एन्ट्री झाली तेव्हा सुरक्षा रक्षकांनी शाहरुख खानला चेक केले. त्यावेळी शाहरुख खान जवळ एक फुल्ल लोडेड गन होती. जेव्हा सुरक्षा रक्षकांनी शाहरुखला गनबद्दल विचारले. तेव्हा त्याने सांगितले की, ‘मी खूप मोठा सुपरस्टार आहे आणि ही गन मी माझ्या सुरक्षेसाठी ठेवली आहे.’ त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी शाहरुख खानला या गनचे कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. पण त्याने या गोष्टीला नकार दिला. तो म्हणाला की, ‘तुला माहीत आहे ना मी शाहरुख खान आहे.’ यावर सुरक्षा रक्षकांनी उत्तर दिले की, ‘हा असाल तुम्ही शाहरुख खान. पण नियम हे नियम असतात.’

इथून वादाला सुरुवात झाली. शाहरुख मागे हटायला तयार नव्हता. आणि सुरक्षा रक्षक त्यांना सोपवलेली जबाबदारी पार पाडत होते. मग ही सर्व गोष्ट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समजली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शाहरुख खानसाठी एक संदेश पाठवला. त्या चिठ्ठी मध्ये असं लिहिलं होतं की, ‘हे सर्व प्रकरण लवकरात लवकर संपव आणि सुरक्षा रक्षकांना त्या गनचे कागदपत्रे आणि लायसन्स दाखव. जर असे झाले नाही तर मग मी स्वतः या सर्व प्रकरणात पडेल आणि बघेल की शाहरुख खानचे चित्रपट थेअटरमध्ये रिलीजच कसे होतात?

हा संदेश शाहरुख खानपर्यंत पोहोचला. त्यानंतर शाहरुख खानचे डोके चांगलेच ठिकाण्यावर आले. त्याला त्याची चुक समजली. त्यानंतर शाहरुख खानने लगेच सुरक्षा रक्षकांची माफी मागितली. एवढं नाही तर त्याने स्वतः गाडीतून गनची कागदपत्रे आणून त्यांना दाखवली. मग सुरक्षा रक्षकांनी शाहरुख खानला आतमध्ये जाण्याची परवानगी दिली. पार्टीमध्ये गेल्यानंतर शाहरुख खान खुप शांत होता. तो कोणाशी जास्त बोलला नाही. पण या घटनेनंतर शाहरुख आणि फिरोज नाडीयडवाला यांच्यामध्ये खुप भांडण झाले आणि त्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही.