क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी ! शिखर धवन ला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

आयपीएल 2022 च्या प्लेऑफसाठी 4 टीम पात्र ठरल्या. पण यामध्ये शिखर धवनची टीम पंजाब किंग्जचं नशीब यंदाही खराब ठरलं. पंजाबला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. दरम्यान यानंतर पंजाब टीमचा खेळाडू आणि टीम इंडियाचा गब्बर शिखर धवनला मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडीयोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आयपीएल 2022 च्या 15 व्या सिझनमध्ये, बंगळुरूसाठी प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खूप कठीण ठरला. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावं लागलं होतं. मात्र दिल्लीच्या पराभवाने आरसीबीसाठी प्लेऑफचे मार्ग खुले झाले. 

या सिझनमध्ये पंजाब किंग्जकडूनही खूप अपेक्षा होत्या. मात्र सिझनमध्ये चांगली सुरुवात करूनही मयांक अग्रवालच्या टीमला ही गती राखता आली नाही. शिखर धवनलाही या सिझनला फारशी छाप पाडता आली नाही.

पंजाब किंग्जला त्यांच्या खराब कामगिरीचा फटका बसला तो प्लेऑफमधून बाहेर पडले. पंजाब किंग्समध्ये शिखर धवन, बेअरस्टो, राजपक्षे, मयंक आणि लिव्हिंगस्टोनसारखे स्टार फलंदाज होते. पण तरीही पंजाबला प्ले ऑफमध्येही स्थान मिळवता आलं नाही. यानंतर शिखर धवनने इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय.

या व्हिडिओमध्ये शिखर धवनला त्याचे वडील मारहाण करताना दिसतायत. पण, त्याने हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “मला माझ्या वडिलांनी नॉक आऊटसाठी क्वालिफाय न झाल्याने त्यांनी मला नॉक आऊट केलं.” 

दरम्यान शिखर धवनच्या चाहत्यांना हा व्हिडीयो खूप आवडला असून त्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.