लवकरच लग्न करणार होता सिद्धू मूसेवाला…, ह्या सुंदरीला बनवणारा होता ‘बायको’

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या निधनाने मनोरंजन जगतावर शोककळा पसरली आहे.मुसेवाला यांनी ‘जी वॅगन ‘ पासून आपल्या करिअर ची सुरुवात केली होती, पण २०१७ साली “सो हाय” या गाण्यानंतर ते रातोरात स्टार झाले होते.

सिद्धू असे गायक होते ज्यांना सतत विवादात राहणं आवडायचं. परंतु तरी सुद्धा त्यांना चाहते व दर्शकांकडुन खूप प्रेम मिळालं. मुसेवाला यांचं वयाच्या फक्त २८ व्या वर्षी जाणं पाहून आजही लोकांना खूप दुःख होत आहे. याच वेळी अशी बातमी समोर येत आहे की लवकरच ते आपल्या प्रेयसीशी लग्न करणार होते.

जानेवारी २०२२ मध्ये मुसेवाला यांच्या आईनेच याबाबतीत खुलासा केला होता , की ते त्यांच्या प्रेयसीशी लग्न करणार आहेत. मुसेवाला यांची एक प्रेयसी होती हे तर सगळ्यांना माहीत होतं ,पण ती कोण हे आजही एक रहस्यच आहे. खरंतर ते आपल्या प्रेयसी विषयी मीडिया सोबत केव्हाच बोलले नाहीत , त्यांनी ही गोष्ट कायमच गुप्त ठेवली.

असे म्हटले जाते मुसेवाला आपल्याच असिस्टंट ला डेट करत होते व ते दोघे याच वर्षी लग्न करणार होते. अलीकडेच मुसेवाला यांच्या आई आपल्या मुलाच्या लग्नाविषयी बोलताना म्हणाल्या होत्या की ,”फक्त थोडा वेळ अजून , त्यानंतर तो सिंगल नाही राहणार , आम्ही लग्नाची तयारी केली आहे. लग्न यावर्षी निवडणुकांनंतर होईल”.

नुकताच पंजाबच्या मनसा जिल्ह्यामध्ये रविवारी (२९ मे) झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सिद्धू मुसेवाला यांची दिवसाढवळ्या गो’- ळी मारून ह’- त्या करण्यात आली होती. घटनेनंतर लगेच त्यांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मुसेवाला यांच्या सोबत ही अकल्पनिय घटना जेव्हा घडली त्याच्या एक दिवस अगोदरच त्यांची सुरक्षा पंजाब सरकारने काढून घेतली होती.