फार कमीच लोकांना माहीत आहे अभिनेत्री श्रीदेवी आणि कमल हसन यांचं ‘हे’ नातं!

कमल हसन यांचं पर्सनल आयुष्य नेहमीच वादात होतं. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. असंच एक नाव म्हणजे श्रीदेवी. मात्र, त्यांनी दोघांच्या नात्याचं खरं सांगितलं आहे. साऊथ सुपरस्टार कमल हसन यांचा ७ नोव्हेंबर वाढदिवस असतो. ते केवळ साऊथमधीलच नाही तर हिंदी सिनेमातीलही लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी अभिनेते, डान्सर, दिग्दर्शक, स्क्रीन रायटर, निर्माता, प्लेबॅक सींगर म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी राजकारणातही हात आजमावला आहे. कमल हसन यांचं पर्सनल आयुष्य नेहमीच वादात होतं. अनेक अभिनेत्रींसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. असंच एक नाव म्हणजे श्रीदेवी. मात्र, त्यांनी दोघांच्या नात्याचं खरं सांगितलं आहे.

श्रीदेवी-कमल हसनची केमिस्ट्री होती हिट

कमल हसन आणि श्रीदेवी यांनी सोबत अनेक भाषांमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. ‘सदमा’ त्यांचा आयकॉनिक सिनेमा मानला जातो. यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. कमल हसन एकदा म्हणाले होते की, त्यावेळी सोबत सर्वात चांगल्या दिसणाऱ्या कपल्सची तुलना श्रीदेवी आणि कमल हसन यांच्याशी करत होते. (तीन अफेअर, दोन लग्न तरीही एकाकी…! अशी आहे कमल हासन यांची लव्हलाईफ)

श्रीदेवीच्या आईला वाटत होतं दोघांनी करावं लग्न

अनेक लोकांसोबतच श्रीदेवी यांच्या आईलाही दोघांची जोडी फार पसंत होती. कमल हसन यांनी श्रीदेवी यांच्यासाठी लिहिलेल्या खास नोट ‘The 28 Avatars Of Sridevi’ मध्ये याबाबतचा खुलासा केला होता. श्रीदेवी यांच्या आईची इच्छा होती की, कमल हसन आणि श्रीदेवी यांनी लग्न करावं. पण सत्य हे आहे की, कमल हसन श्रीदेवी यांना बहिणीसारखे मानत होते.

सिनेमामुळे करत नव्हते खुलासा

कमल हसन यांनी खुलासा केला होता की, आमच्या दोघात बहीण-भावासारखं नातं होतं. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री फार पसंत केली जात होती. फॅन्सना वाटत होतं की, दोघांचं अफेअर आहे. इंडस्ट्रीमधेही हे सांगण्यात आलं होतं की, सिनेमासाठी हे इम्प्रेशन असंच राहिलं पाहिजे. कमल हसन म्हणाले होते की, दोघेही एकमेकांचा फार सन्मान करत होते आणि शेवटपर्यंत श्रीदेवी त्यांना ‘सर’ म्हणून हाक मारत होती.