बॉलिवूड अभिनेत्र्यांपेक्षा लाख पटीने सुंदर ‘या’ गायीकेने आपल्या चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’.. शुभेच्छांचा झाला वर्षाव..

भारतीय चित्रपट क्षेत्रात म्हणजेच बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्र्यांच्या सुंदरतेबद्दल वेगळे काही लिहिण्याची गरज नाहीये. आपल्या सुंदरतेने या अभिनेत्र्यांनी भारतातील तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. भारतातच काय तर अगदी जगभरात या अभिनेत्र्यांचे चाहते आहेत. आपल्या अदाकारीने तसेच सौंदर्याने आपल्या भारतीय अभिनेत्र्या संपुर्ण जगभरात तरुणांच्या हृदयावर राज्य करत आहेत.

परंतु भारतात काही अशाही सौंदर्यवती आहेत ज्या अभिनय क्षेत्रात नसून देखील त्यांच्या सौंदर्याची सर्वत्र स्तुती होत राहते. विशेषतः संगीत आणि क्रीडा क्षेत्रात असणाऱ्या सुंदर महिला. सायना नेहवाल, दीपिका पल्लीकल सारख्या सुंदर खेळाडूं तसेच सुनिधी चौहान, शाल्मली खोलगडे या गायिकांचे देखील लाखो चाहते आहेत.

आज आपण अश्याच एका गायिके बद्दल बोलणार आहोत जिने आपल्या पार्श्वगायन क्षेत्रातील कामगिरीमुळे तर नाव कमावलंच, परंतु आपल्या सौंदर्याने देखील अनेक तरुणांच्या हृदयावर भुरळ घातली. आम्ही बोलत आहोत भारतीय संगीत पार्श्व गायिका श्रेया घोषालबद्दल. श्रेयाने आपल्या गायन क्षेत्रामधील कामगिरीने भारताला अनेक अभिमानाचे क्षण दिले आहेत.

तर सध्या श्रेया घोषाल पुन्हा एकदा चर्चेत आहे ते म्हणजे तिने दिलेल्या गुड न्यूज मूळे. गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल लवकरच आई बनणार आहे असे तिने तिच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर केले आहे. कोरोना काळात सध्या मनोरंजन विश्वातून अशाच अनेक चांगल्या बातम्या आल्या आहेत. करीना कपूर, कपिल शर्मा, अनुष्का शर्मा आणि बर्‍याच टीव्ही सेलिब्रिटीनंतर श्रेया देखील आता आपल्या बाळाला जन्म देणार आहे.

श्रेयाने नुकतेच तिच्या ट्विटर खात्यावरून लिहिले आहे की, ‘बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे. ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना मला आणि शीलादित्यला खूप आनंद होत आहे. तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू झाल्यामुळे आपणा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादांची आम्हाला गरज आहे.’

लॉकडाऊन दरम्यान श्रेयाचे ‘आंगना मोरे’ हे गाणे तुफान हिट झाले होते. श्रेयाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, जेव्हा लॉकडाऊन दरम्यान ती खूप कंटाळली होती, तेव्हा तिला या गाण्याची कल्पना सुचली. ती म्हणते की, हा वाईट काळ सगळ्यांसाठीच निराशाजनक होता. सगळेच जण यातून बाहेर पडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होते.

मात्र, या वाईट काळातही आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव झाला, असे श्रेया म्हणाली. या मुलाखती दरम्यान श्रेयाने सांगितले होते की, 2020चा लॉक डाऊन हा सगळ्यांना कंटाळवाणा गेला असला तरी मला मात्र मध्ये कुटुंबासमवेत आणि गाण्याच्या रियाझसाठी खूप वेळ मिळाला. या काळात तिने बागकाम, साफसफाई आणि स्वयंपाक यासारख्या गोष्टी देखील करून पाहिल्या. या गोष्टींमध्येही आपल्याला खूप आनंद मिळतो हे तिला जाणवले.

श्रेया 2015 साली प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत विवाहबंधनात अडकली. बंगाली रितीरिवाजानुसार श्रेया-शिलादित्यचं लग्न झालं होतं. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित लग्न झालं. विशेष म्हणजे तिने त्यावेळी लग्नातला केवळ एकच फोट शेअर केला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर तिने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘सा रे ग म प’ ही स्पर्धा जिंकल्यानंतर श्रेयाने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने ‘देवदास’ या हिंदी चित्रपटातून पार्श्वगायिका म्हणून कलाविश्वात पदार्पण केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. श्रेया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. बऱ्याच वेळा श्रेया पती शिलादित्यसोबतचे फोटो शेअर करत असते.