‘तुम्ही इतकं घाण काम का करता?’ बोल्ड सीन पाहून अभिनेत्याचा लहान मुलीने विचारला प्रश्न

आपल्या भूमिकेला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक कलाकार धडपड करत असतो. त्यामुळे पडद्यावर स्टारगिरी करणाऱ्या कलाकाराला पडद्यामागे किती मेहनत घ्यावी लागते हे फार मोजक्या जणांना माहित आहे. यात कॉमेडी सीनपासून ते बोल्ड सीनपर्यंत प्रत्येक भूमिका कलाकाराला साकारावी लागते.

मात्र, हे सीन साकारत असताना अनेकांना त्यांनाही अवघडल्यासारखं होत असतं. कारण, सामान्य प्रेक्षकांप्रमाणेच हे सीन त्यांचे कुटुंबीयदेखील पाहात असतात. असाच एक बोल्ड सीन केल्यानंतर अभिनेता शर्मन जोशीला एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.

बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘3 इडियट्स’, ‘हेट स्टोरी 3’ या चित्रपटात झळकलेल्या शर्मनने ‘हेट स्टोरी 3’  या चित्रपटात काही बोल्ड सीन दिले होते. हे सीन पाहिल्यानंतर त्याच्या मुलीने त्याला थक्क करणारा प्रश्न विचारला होता.

काय होता शर्मनच्या लेकीचा प्रश्न?

‘हेट स्टोरी 3’ मध्ये शर्मनने दिलेले बोल्ड सीन त्याच्या लहान मुलीने पाहिले होते. हे सीन पाहिल्यानंतर तुम्ही इतकं घाण काम का करताय? असा प्रश्न तिने विचारला. लेकीच्याल या प्रश्नामुळे शर्मन पूरता ओशाळला होता. परंतु, मुलांच्या शंकेचं निरसन तेव्हाच करणं गरजेचं असतं हे समजून त्याने तिची समजूत काढली.

दिग्दर्शक जे सांगेल ते कलाकारांना करावं लागतं, असं शर्मन म्हणाला. दरम्यान, शर्मनने दिवंगत अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या लेकीसोबत प्रेरणासह २००० मध्ये लग्नगाठ बांधली आहे. शर्मन आणि प्रेरणा यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्नगाठ बांधली.