छोटे कपडे घातले तर लोक मला ‘त्याची’ साईज विचारतात अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा

सध्याच्या काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. जवळपास सगळेच कलाकार, मग ते मोठ्या पडद्यावरील कलाकार असोत, किंवा छोट्या पडद्यावरील, आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. ज्यावर त्यांचे हजारो फॉलोवर्स त्यांच्या अपडेट जाणून घेत राहतात.

पण जसे सोशल मीडियाचे फायदे आहेत, तसे काही तोटेही आहेत. सोशल मीडियावर फोटोज अपलोड केल्यावर जसं स्तुती ऐकायला मिळते, तसंच अनेकदा वाईट टिप्पण्या देखील बघायला मिळतात. असाच काहीसा अनुभव एका सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने शेअर केला आहे जी बॉडी शेमिंगची शिकार ठरली.

हिंदी टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री सयांतनी घोष हीने बॉडीशेमिंग वर भाष्य केलं आहे. नुकताच तिला इन्स्टाग्रामवर एका युजरकडून या गोष्टीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर तिने एक मोठी पोस्ट लिहून त्यावर भाष्य केलं होतं. पण त्यानंतर एका मुलाखतीत तिने तिला आलेल्या आणखी अनुभवांबद्दल देखील सांगितलं आहे. करिअरच्या सुरुवातीपासूनच या गोष्टींचा सामना करावा लागल्याचंही तिने स्पष्ट केलं

अनेक हिंदी मालिकांमध्ये संयातनीने काम केलं आहे. पण तिने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. टाईम्स ऑफ इंडिया ला दिलेल्या एका मुलाखतीत संयातनीने बॉडीशेमिंग विषयी काही खुलासे केले आहेत. यातच तिने आपल्या सोबत सोशल मीडियावर नुकताच घडलेला एक किस्सा देखील सांगितला आहे.

“जेव्हा मी मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली मी फार लहान होते. लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पहायचे आणि कमेंट्स पास करायचे. लोकांना हे समजत नाही की हे एखाद्या व्यक्तीला किती नुकसान पोहोचवू शकतं.” संयातनी म्हणाली. या सगळ्या कमेंट्स ऐकून एखाद्याला किती वाईट वाटू शकतं याचा विचार कमेंट करणार्याने करायला हवा असं ही तिने यापुढे म्हटले.

संयातनीला नुकतंच पुन्हा एकदा बॉडीशेमिंगला सामोरं जावं लागलं. एका युजरने तिला ब्रा साइज विचारली. त्यानंतर तिने एक पोस्ट लिहीली होती. त्या कमेंट विषयी बोलताना संयातनी म्हणाली “अशा गलिच्छ कमेंट्सची ही काही माझी पहिलीच वेळ नाही.

केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही, तर एक महिला म्हणून देखील माझ्याकडे लोक वेगळ्या नजरेने पाहतात, कमेंट्स पास करतात. इतकी वर्षे मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मी बोलायला घाबरत होते म्हणून नाही तर मला अशा गोष्टींना विशेष महत्त्व द्यायचं नव्हतं”.

असे अनेक खुलासे संयातनीने तिच्या मुलाखतीत केले. संयातनी सध्या ‘तेरा यार हूँ मै’ या सब टिव्हीच्या मालिकेत काम करत आहे. 2006 मध्ये सयांतनिने टिव्ही विश्वात पदार्पण केलं होत. कुमकुम, घर एक सपना, नागिन , महाभारत, ससूराल सिमर का, कुबूल है, करण संगिनी , बॅरिस्टर बाबू अशा लोकप्रिय मालिंकांमध्ये ती झळकली होती.