रंगाने सावळ्या असूनही या अभिनेत्र्यांनी जिंकलं बॉलिवूड.. 5 नंबर वालीला तर सावळ्या रंगामुळे डायरेक्टरने हाकलून दिलं होतं

मित्रांनो, भारतीय समाजव्यवस्थेत वर्णभेदाला अजिबात थारा नाही आहे. परंतु वर्णभेद जरी नसला तरी मात्र सौंदर्याची संकल्पना ही आजही कुठेतरी गोऱ्या रंगाशी जोडली गेल्याची दिसून येते. जणू गोरं असणं म्हणजे सुंदर असणं असं काही समीकरणच बनलं आहे. त्यामुळेच सर्वच लोकांना आपण अधिकाधिक गोरं कसं दिसता येईल अशी चुरस लागलेली असते.

पण खरं सांगायचं तर रंग आणि सौंदर्य या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही एक संबंध नाहीये. आपला आत्मविश्वास, आपले शरीर, आपल्या त्वचेची गुणवत्ता आणि आपला आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला आकर्षक बनवत असतात. एखादी व्यक्ती त्वचेने पांढरी नसली तरी आपल्या तंदुरुस्त आणि सुदृढ शरीरयष्टीने देखील लोकांना आकर्षित करू शकते.

बरं ही तर गोष्ट झाली आपल्या सामान्य लोकांची, परंतु बॉलिवूड हे एक असं क्षेत्र आहे जिथे अभिनेत्रिंना सुंदर दिसणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत त्वचेने गोऱ्या असणाऱ्या अभिनेत्रींना अधिक संधी दिली जाते हे सर्वांनाच माहीत आहे. व त्या मानाने सावळ्या असणाऱ्या अभिनेत्र्या , भलेही त्या अभिनयात सरस असतील, तरीही त्यांना कुठेतरी डावललं जातं.

पण आज आपण अश्या काही अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत खरंतर रंगाने सावळ्या आहेत, परंतु त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकली. गोरं असण म्हणजे सक्सेसफुल असं ही लोकांची विचारधारा या अभिनेत्रयांनी मोडीत काढली. काहींनी तर चक्क हॉलीवुड पर्यंत मजल मारली. तर चला जाणून घेऊयात कोण आहेत या अभिनेत्र्या..

दिपीका पादुकोण: इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केल्यापासूनच दीपिका पादुकोण खूपच सावळ्या रंगाची अभिनेत्री आहे. परंतु गोरं दिसण्यासाठी दीपिकाने कधीही शस्त्रक्रिया किंवा उपचाराचा अवलंब केला नाही. निसर्गाने तिला दिलेल्या त्वचेच्या जोरावर, तिने केवळ बॉलिवूडमध्येच आपले स्थान निर्माण केले नाही तर तिला शीर्ष अभिनेत्रीचे पदही मिळाले. बॉलिवूडमधील उर्वरित गोऱ्या गोमट्या अभिनेत्रींच्या तुलनेत आज दीपिका ही सावळी असली तरी सर्वाधिक फी घेते.

प्रियांका चोप्रा: प्रियांका चोप्रानेही डार्क स्किनसह बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. प्रियांकाने अगदी गडद रंग असूनही मिस वर्ल्डचे विजेतेपद जिंकले. यानंतर ती बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रीही ठरली आहे. आणि आपल्या सर्वांना माहितच आहे की, आता ती हॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसू लागली आहे. म्हणून आपण असे म्हणू शकता की आपल्या यशासाठी आपल्या रंगापेक्षा अधिक आपली प्रतिभा महत्त्वाची आहे.

शिल्पा शेट्टी: 90 च्या दशकात लोकांच्या हृदया वर राज्य करणारी शिल्पा शेट्टी देखील काळ्या त्वचेची अभिनेत्री आहे. विशेषत: जेव्हा तिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला तेव्हा ती अधिक सावळी होती. पण तरीही लोक जेव्हा शिल्पा बघायला आणि तिचा नृत्य बघायला थिएटरमध्ये येत असत तेव्हा शिट्ट्याचा वर्षाव होत असे. शिल्पा तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. सध्या वयाने 40 पेक्षा अधिक असूनही, ती आजही कमालीची आकर्षक दिसते.

काजोल: आपल्या सर्वांची लाडकी मराठमोळया काजोलने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा ती खूपच सावली दिसत होती. परंतु असे असूनही, त्याने 90 च्या दशकात बरेच यश मिळविले.आजही काजोल तिच्या काळातील सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री मानली जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळवले

बिपाशा बसू: सावळ्या रंगाची बिपाशा बसु एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री मानली जात होती. त्यांच्या ‘जिस्म’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसला आग लावली होती. बिपाशाचं असं मत होतं की तिला यश मिळवण्यासाठी गोऱ्या स्किनची काही एक गरज नव्हती. त्यामुळेच तिने कोणत्याही प्रकारची प्लास्टिक सर्जरी देखील केली नाही.

तिने फक्त आपल्या अदाकारीच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं. बिपाशाने एका मुलाखतीत खुलासा केला की जेव्हा ती पहिल्यांदा एका ऑडिशन साठी गेली होती तेव्हा तिला तिच्या सावळ्या रंगामुळे नापसंत करण्यात आलं होतं.