सारा तेंडुलकर ‘या’ विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात; सगळ्यांसमोर दिली प्रेमाची कबुली

प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा हिनं अलिकडेच मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. अर्थात त्याआधीपासून सारा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आणि लोकप्रिय आहे. सारा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत तिचे फोटो, व्हिडिओ काही ना काही शेअर करत असते. त्यावर तिचे चाहते भरभरून लाईक्स आणि कॉमेन्टही करत असतात.

साराच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल प्रत्येकाला रस आहे. तिच्या आवडीनिवडी काय आहेत, तिला कोण आवडतं, तिचा बॉयफ्रेंड आहे का, असला तर कोण आहे अशा एक ना अनेक गोष्टींबद्दल प्रत्येकाला कुतूहल आहे. एका मुलाखतीमध्ये सारानं तिला आवडणाऱ्या व्यक्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचं सारानं जे उत्तर दिलं, त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.

काय म्हणाली सारा?

साराला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं होतं की तिला बॉलिवूडमधला कोणता अभिनेता आवडतो? या प्रश्नाचं सारानं कोणताही विचार न करता रणवीर सिंगचं नाव घेतलं. तिनं पुढं असंही सांगितलं की, तिला रणवीर सिंग प्रचंड आवडतो. त्याचा अभिनय,त्याची बॉडी लँग्वेज, त्याची हटके स्टाईल या सगळ्याची प्रचंड मोठी चाहती आहे.

रणवीरचा सिनेमा ती पहिल्याच दिवशी थिएटरमध्ये जाऊन आवर्जून बघते. या मुलाखतीमध्ये रणवीर तिचं क्रश असल्याचं सांगत त्याच्याबद्दल ती भरभरून आणि प्रेमानं बोलली आहे. सारा तेंडुलकर हिनं अलिकडेच एका नामवंत कपड्यांच्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये काम केलं आहे.या जाहिरातीमधील तिचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

तिनं मॉडेलिंग अथवा बॉलिवूडमध्ये प्रवेश करावा अशी तिची चाहत्यांची इच्छा आहे.मात्र, तिचे वडील सचिन तेंडुलकर यांना सारानं तिच्या अभ्यासावर आणि तिच्या करियरवर फोकस करावा असं वाटतं आहे. आता सारा नेमकं काय करणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे.