सानियाने पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत लग्न केल्यानंतर आता तिची बहीण देखील त्याच मार्गावर.. पुन्हा एकदा करणार निकाह..

भारतीय चित्रपट क्षेत्रात म्हणजेच बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्र्यांच्या सुंदरतेबद्दल वेगळे काही लिहिण्याची गरज नाहीये. आपल्या सुंदरतेने या अभिनेत्र्यांनी भारतातील तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. भारतातच काय तर अगदी जगभरात या अभिनेत्र्यांचे चाहते आहेत. आपल्या अदाकारीने तसेच सौंदर्याने आपल्या भारतीय अभिनेत्र्या संपुर्ण जगभरात तरुणांच्या हृदयावर राज्य करत आहेत.

परंतु भारतात काही अशाही सौंदर्यवती आहेत ज्या अभिनय क्षेत्रात नसून देखील त्यांच्या सौंदर्याची सर्वत्र स्तुती होत राहते. विशेषतः क्रीडा क्षेत्रात असणाऱ्या सुंदर खेळाडू. सायना नेहवाल, दीपिका पल्लीकल सारख्या सुंदर खेळाडूंचे देखील लाखो चाहते आहेत.

आज आपण अश्याच एका खेळाडू बद्दल बोलणार आहोत जिने आपल्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीमुळे तर नाव कमावलंच, परंतु आपल्या सौंदर्याने देखील अनेक तरुणांच्या हृदयावर भुरळ घातली. आम्ही बोलत आहोत भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा बद्दल. सानियाने आपल्या टेनिस मधील कामगिरीने भारतानं अनेक अभिमानाचे क्षण दिले आहेत.

सानिया मिर्झा आपल्या टेनिस मधील करिअर मुळे तर कायम प्रकाशझोतात राहिलीच, परंतु त्या सोबतच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातही कायम चर्चेचा विषय राहिली आहे. आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे तिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सोबत केलेला विवाह. तिच्या या निर्णयामुळे ती बराच वेळ चर्चेत राहिली होती.

अशा परिस्थितीत सानिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे, आणि या वेळी या चर्चेचे कारण तिची बहीण अनम मिर्झा आहे. अनम मिर्झा आजकाल माजी क्रिकेटपटू अझरुद्दीनचा मुलगा असदला डेट करत आहे. त्यांच्या लग्नाबद्दल अनेक अनुमान मीडियामध्येही रंगवले जात आहेत.

दरम्यान, सानियाने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर असदसोबतचे एक छायाचित्र शेअर केले होते. त्या छायाचित्रात तिने असदचे तिच्या कुटुंबातील सदस्य असल्याचे वर्णन केले आहे. ज्यात तिने कॅप्शनसोबत हार्ट इमोजी देखील टाकली होती. सर्वप्रथम तर तिच्या फॉलोअर्स मध्ये संभ्रम निर्माण झाला कारण असद चे त्यांच्या कुटुंबापासोबत काहीच संबंध नव्हते. मग नंतर अनम आणि असद यांच्यातील नात्याचे कोडे उलगडले.

सानियाच्या या पोस्टवरून हे निश्चित झाले की या नात्यासाठी सानियाची परवानगी नक्कीच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या वर्षाच्या अखेरीस दोघांचे लग्न होणार आहे. परंतु अद्याप याची पुष्टी पूर्णपणे झालेली नाही. परंतु दोघांना कायमच सोबत बघण्यात येत आहे. आणि आता तर स्वतः सानियाने याबाबत चित्र स्पष्ट केलं आहे.

अनमने यापूर्वी 2016 मध्ये हैदराबादच्या व्यावसायिक अकबर राशिदशी लग्न केले होते. पण लवकरच त्यांचा घट-स्फो-ट झाला. त्यानंतर अनम आणि असदची जवळीक वाढली. अनम मिर्झा ही फॅशन आउटलेट ‘द लेबल बाजार’ची मालकीण आहे आणि ती असदपेक्षा तीन वर्षाने मोठी आहे. पण वयाने मोठी असूनही असद तिच्या प्रेमात पडला आहे आणि दोघांची लग्न करण्याची इच्छा आहे. असद वर त्याच्या वडिलांचा खूप प्रभाव पडला आहे आणि त्याला आपल्या वडिलांप्रमाणेच एक क्रिकेटपटू व्हायचे आहे आणि जगभर आपली ओळख प्रस्थापित करायची आहे. सध्या तो गोव्यात आहे आणि गोव्याकडून रणजी संघात खेळत आहे.