धक्कादायक; घटस्फोटानंतर समांथाने केली मोठी घोषणा!

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. त्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला होता. या सगळ्यात समांथा विषयी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

समांथा लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे.समांथा तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात करणार आहे. ड्रिम वॉरियर पिक्चर या प्रोडक्शन हाऊसने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. त्यांनी समांथाचं एक पोस्टर शेअर केलं आहे.

या चित्रपटात समांथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित शांतरुबन ज्ञानसेकरन करणार आहेत. हा चित्रपट दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलुगू आणि तमिळ भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती एसआर प्रकाश बाबू आणि एसआर प्रभू करणार आहेत. सामंथा लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.