जेव्हा ‘या’ अभिनेत्रीला सलमानने दिली होती आ-ई बनण्याची ऑफर.. त्यावर तिने दिली अशी प्रतिक्रिया..

‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’ ही पंक्ती सामान्य जीवनासोबतच बॉलिवूड मध्ये देखील लागु पडते. बॉलिवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. जसे काही कलाकार असे आहेत जे मनाने अतिशय हळवे आहेत.. काही सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत तर काही कलाकार असे देखील आहेत जे आपल्या रागासाठी प्रसिद्ध आहेत.

सलमान खान हा बॉलीवूडमध्ये जितका त्याच्या अफाट असलेल्या मित्रपरिवारासाठी प्रसिद्ध आहे तितकाच किंबहुना त्याहून जास्त त्याच्या रागासाठी ओळखला जातो. सलमान आणि शाहरुख मध्ये आता जाती मैत्री झाली असली, तरी इतके वर्षे त्यांच्यात असलेले भांडण सर्वाना माहीतच आहे. त्याचप्रमाणे त्याने विवेक ओबेरॉय सारख्या मातब्बर कलाकाराला फक्त एका छोट्याशा भांडणामुळे कसे बॉलिवूडच्या बाहेर फेकले, हे देखील सर्वांना माहीत आहे.

त्यामुळे कोणीही त्याच्याशी पंगा घेत नाही. जर कोणी चुकुन पंगा घेतला तर मग त्याची खैर नाही. त्यामुळे सलमान खान नेहमी त्याच्या मित्रांची काळजी घेतो आणि जे त्याचे दुष्मन आहेत त्यांना नेहमी त्याचप्रकारे वागवतो. त्याच्या स्वभावामूळे अनेकजण त्याच्याशी पंगा घेत नाही. पण एकदा एका अभिनेत्रीने त्याच्याशी पंगा घेतला होता. ज्याचे फळ तिला अनेक वर्षे भोगावे लागले.

आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती म्हणजे एकेकाळची सुप्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाबद्दल. जुहीने एकदा सलमानसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण तिच्या त्या एका नकारामूळे तिला तिच्या करिअरमध्ये परत सलमान खानसोबत काम करता आले नाही.

हा किस्सा आहे ९० च्या दशकातील. जुही चावलाचा पहिलाच चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ हा सुपरहिट झाला होता. त्यामूळे ती रातोरात सुपरस्टार झाली होती. जुहीला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. ती अनेक चित्रपट करत होती. तिच्या सुंदरतेने आणि अदाकारीने तिने अनेकांचे हृदय जिंकले होते.

दुसरीकडे सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामूळे सलमान खानलासुद्धा अनेक चित्रपटांच्या ऑफर येते होत्या. याच कालावधीमध्ये निर्माते बॉबी खेंटने सलमान खानला एका चित्रपटाची ऑफर दिली. सलमानने बॉबी सोबत असलेल्या मैत्री पोटी त्या चित्रपटाला होकार दिला.

या चित्रपटासाठी बॉबी खेंटने मुख्य अभिनेत्री म्हणून जुही चावलाला ऑफर दिली. जुहीने सुरुवातीला या चित्रपटासाठी ना होकार दिला ना नकार दिला. तिने अनेक दिवस उत्तरच दिले नाही. तिने स्क्रिप्ट ऐकून घेतली आणि पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली. या मुळे निर्माते बॉबी खेन्ट यांची जुहीला बोलवून घेतले.

पण तिने अनेक महिने या चित्रपटासाठी होकारच दिला नाही. त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी जुही चावलाला जेव्हा उत्तर मागितले. त्यावेळी तिने निर्मात्यांसमोर एक अट ठेवली. या चित्रपटात जर निर्मात्यांनी सलमान खानच्या जागी आमिर खानला घेतले. तरच ती या चित्रपटात काम करेल.

जुहीची ही अट निर्मात्यांना मान्य नव्हती. त्यामूळे त्यांनी ठरवले की हा चित्रपट बनवायचा नाही. त्यांनी या चित्रपटाचे काम थांबवले. पण जेव्हा सलमान खानला समजले की, जुहीने त्याच्यासोबत काम करायला नकार दिला. त्यावेळी त्याला राग आला. पण त्याने काही केले नाही. तो त्याच्या करिअरमध्ये व्यस्त झाला.

पण त्यानंतर सलमानने कधीही जुही चावलासोबत काम केले नाही. त्याने नेहमी नकार दिला. पण २०१३ मध्ये परत एकदा जुही चावला आणि सलमान खान समोरासमोर आले. जुही सलमान खानच्या बिग बॉस या शोमध्ये गेस्ट म्हणून आली होती.

या शोमध्ये जुहीने सलमानला प्रश्न केला की, तु ९० च्या दशकातील सगळ्या अभिनेत्रींसोबत काम केले. पण माझ्यासोबत तु कधीच काम केले नाही. यामागे काय कारण आहे? यावर सलमान खानने उत्तर दिले की, ‘मी तुझ्यासोबत काम करायला तयार होतो. पण तु माझ्यासोबत काम करायला नकार दिला. कारण तुला आमिर खानसोबत काम करायचे होते.’

त्यावेळी जुहीला समजले की, तिने एकदा सलमान खानसोबत काम करायला नकार दिला. म्हणून सलमानने तिच्यासोबत परत कधीच काम केले नाही. ज्यावेळी जुहीने सलमानला आपण आत्ता एवढ्या वर्षांनंतर एकत्र काम करु असे सांगितले. त्यावेळी सलमानने जुहीला त्याच्या आईची भुमिका करण्याची ऑफर दिली.