सिद्धार्थ गेल्यानंतर काही महिन्यांतच शहनाज दाखवले तिचे रंग, सलमान कडे चक्क केली ‘असली’ मागणी

यंदा सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी झालेली ईद पार्टी लक्षात ठेवली जाईल. पार्टी खूप आनंदी आणि मस्त होती, तिथे जणू खूप दिवसांनी सेलेब्सचा मेळावाच भरला होता. या पार्टीला चार चाँद लावण्यासाठी शहनाज गिलही पोहोचली होती.

शहनाज गिलने पार्टीतून बाहेर पडताना सलमानसोबतचे बॉन्डिंग दाखवून लाइमलाइट मध्ये येण्याचा एकही मार्ग सोडला नाही. मात्र दबंग खानसोबतच्या या जवळीकींमुळे शहनाजही प्रचंड ट्रोल होत आहे. जेव्हा हा व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये शहनाज गिल सर्वांसमोर सलमान खानसोबत जवळीक दाखवताना दिसत आहे.

शहनाज गिल सलमान खानसोबत हसताना तर कधी सलमान चा किस घेतांना तर कधी मिठी मारतांना, तर कधी कानात काही कुजबुज करतांना दिसत आहे.  यानंतर शहनाज गिलने सलमान खानचा हात ओढत त्याला तिच्या कारजवळ नेले आणि दबंग खानला म्हणाली तिला सोडण्यास ये. सलमान आणि शहनाजची बाँडिंग काहींना आवडली, तर अनेकांना शहनाजचं हे वागणं अजिबात आवडलं नाही.

शहनाज गिलला तिच्या अश्या वागण्यामुळे ट्रोल करण्यात येत आहे. शहनाज बळजबरीने सलमान खानला चिकटत आहे, असे ट्रोल करणाऱ्यांचे म्हणणे आहे. पंजाबच्या या कतरिना कैफला लोकांनी छिछोरी देखील म्हंटले आहे. शहनाजच्या ट्रोलिंगमध्ये आता तिचा खास मित्र सिद्धार्थ शुक्ला याचे जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिद्धार्थचे हे ट्विट महिलांच्या सन्मानाबद्दल बोलत असतांनाचे आहे.

सिद्धार्थचे ट्विट व्हायरल

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांने ट्विटमध्ये लिहिले – तुम्ही एका महिलेबद्दल जे काही ऐकता त्याबाबत आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, ह्या अफवा एकतर ज्या पुरुषाला ती मिळाली नसेल किव्हा त्या महिले कडून आलेली असेल जी कधीच तिच्याशी सामना करू शकलेली नसेल.

सिद्धार्थचे हे ट्विट 2015 सालचे आहे. त्यावेळी तो दिल से दिल तक या मालिकेत काम करत होता. शोमधील त्याचा प्रवास बराच वादग्रस्त ठरला होता. शोमधील त्याची को-स्टार रश्मी देसाईसोबत त्याचा मोठा वाद झाला होता.