त्याने तिला टॉप व ब्रा…! जिया खानच्या बहिणीने साजिद खानवर केले गंभीर आरोप

बॉलिवूडचा दिग्दर्शक साजिद खान पुन्हा एकदा गैरवर्तनाच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. साजिदवर पुन्हा लैंगिक शोषणाचा आरोप लागला आहे. हा आरोप करणारी कोण तर दिवंगत अभिनेत्री जिया खानची बहीण करिश्मा खान. साजिद खानने जियाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करिश्माने केला आहे.

जिया खानच्या आयुष्यावरच्या ‘डेथ इन बॉलिवूड’ ही डॉक्युमेंट्री नुकतीच युकेत रिलीज झाली. या डॉक्युमेंट्रीच्या दुस-या एपिसोडमध्ये करिश्माने साजिदची पोलखोल केली आहे. साजिदच्या गैरवर्तनाने जियाला जबर धक्का बसला होता. ती आतून कोलमडली होती. ती घरी आली तशी रडू लागली. साजिद खानने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा करिश्माने केला आहे.

करिश्माने सांगितली ती घटना

करिश्माने केलेल्या दाव्यानुसार, रिहर्सल सुरु होती आणि जिया स्क्रिप्ट वाचत होती. यादरम्यान साजिदने जियाला तिचे टॉप व ब्रा उतरवण्यास सांगितले. जिया प्रचंड घाबरली. काय करावे, तिला कळत नव्हते. चित्रपट सुरु होण्यापूर्वीच ही स्थिती आहे, हा विचार करून तिला मोठा धक्का बसला होता. घरी येऊन ती ढसाढसा रडली होती. इतके होऊनही तिला तो सिनेमा करावा लागला. मी करार केला आहे.

मी सिनेमा केला नाही तर ते मला बदनाम करतील. माझे करिअर संपुष्टात येईल, असे ती म्हणाली होती. चित्रपटात राहिली तर लैंगिक शोषण होईल आणि तो सोडला तर करिअर संपेल, या दृष्टचक्रात ती अडकली होती. मात्र तरीही तिला हा सिनेमा करावा लागला.हा सिनेमा ‘हाऊसफुल’ होता. या सिनेमात अक्षय कुमार, दीपिका पादुकोण,जॅकलिनफर्नांडिस रितेश देशमुख, लारा दत्ता, अर्जुन रामपाल व जिया खान मुख्य भूमिकेत होते.

माझ्यासोबतही गैरवर्तन केले

साजिदने केवळ माझी बहीण जियासोबतच नाही तर माझ्यासोबतही गैरवर्तनाचा प्रयत्न केला. मला आठवते, मी जियासोबत साजिदच्या घरी गेले होते. मी तेव्हा 16 वर्षांची होते. मी किचन टेबलवर बसले होते आणि तो एकटक माझ्याकडे बघत होता. अचानक, हिला सेक्स करायचे आहे, असे माझ्याकडे पाहून तो म्हणाला. जियाने त्याला लगेच टोकले. काय बकवास करतोय तू? असे जिया त्याला म्हणाली. यावर ती बघ कशी बसली आहे, असे तो म्हणाला. यानंतर आम्ही दोघी बहीणी तिथून निघून गेलोत.