घटस्फोटानंतर आता सई ताम्हणकर पुन्हा एकदा प्रेमात ? सोशल मीडियावर शेअर केला फोटो आपल्या नवीन-

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी सोशल मीडियावरील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या पोस्टनंतर तिने लाइफ पार्टनरचा फोटो शेअर केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. सई ताम्हणकर हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर तेज येते. या कॅप्शनसोबत तिने हॅशटॅगमध्ये वन, साहेब, दौलतराव मेंशन केले आहेत.

या पोस्टनंतर तिचे चाहते तिला हा कोण आहे, नक्की काय समजावे असे विचारत आहेत. तर काही युजर हा तुझा लाइफ पार्टनर आहे का असेही विचारत आहेत. तर सईच्या या पोस्टवर सेलिब्रेटींनीही कमेंट केली आहे. काही सेलिब्रेटींनी हार्ट इमोजी शेअर केली आहे तर प्रिया बापटने अरे वाह अशी कमेंट केली आहे. 

सई ताम्हणकरने २०१३ साली तिचा मित्र अमेय गोसावीशी लग्न केलं होतं.  दोनच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. पण तेव्हापासून ती सिंगल होती. आता तिने शेअर केलेल्या व्यक्तीचं नाव अनीश जोग आहे. अनीश जोगचाही सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. तो सिनेनिर्माता असून त्याने आणि काय हवं? वेबसीरिज, गर्लफ्रेंड, मुरांबा, वायझेड, डबल सीट, टाईम प्लीज आणि धुरळा या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

यापूर्वी अनिश जोगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सईचा आणि त्याचा फोटो शेअर केला होता आणि त्यावर मॅजिक तू आणि मी असे कॅप्शन दिले होते. त्या पोस्टवर सेलिब्रेटींनी खूप कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टवर प्रिया बापटने लिहिले की, क्या बात है फायनली. तर सोनाली कुलकर्णीने प्लस वन अशी कमेंट केली आहे. 

या कमेंटवरून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे समजते. मात्र आता सई ताम्हणकर आणि अनीश जोग कधी त्यांचे नाते जगजाहीर करतात हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.