माझी आई सुनेला नक्कीच बिघडवणार…! रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूरचे धक्कादायक वक्तव्य

रणबीर कपूर व आलिया भट यांचं नातं आता जगापासून लपून राहिलेलं नाही. दोघंही खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात. आता तर दोन्ही कुटुंबानंही हे नातं स्वीकारलं आहे. कदाचित गेल्यावर्षी कोरोनाचं संकट नसतं तर अद्याप आलिया व रणबीरचं लग्नंही झालं असतं. अर्थात लग्न झालं नसलं तरी नीतू कपूर यांनी कधीच आलियाला सून म्हणून स्वीकारलं आहे.

रणबीरच्या घरच्या प्रत्येक सुख-दु:खाच्या प्रसंगात आलिया दिसतेच दिसते. आता रणबीरची बहीण रिद्धिमा साहनी कपूर आपल्या होणा-या वहिनीबद्दल बोलली आहे. माझी आई तिच्या सूनेला अगदी राणीसारखं ठेवणार, असं ती म्हणाली. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रिद्धिमा बोलली. माझी आई नीतू कपूर खूप चांगल्या स्वभावाची आहे. ती खूप चांगली सासू बनणार, हे मी दाव्यानं सांगू शकते.

तिला लोकांच्या पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ करायला आवडत नाही. त्यामुळे निश्चितपणे ती रणबीर व आलियाच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करणार नाही. त्यांना पुरेसी स्पेस देईल. (हसत हसत) माझी आई सूनेचे इतके लाड करेल की, सूनबाई या लाडानंच बिघडतील, असे रिद्धिमा म्हणाली. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर एकट्या राहत आहेत.

मुलगी रिद्धिमा कपूर दिल्लीला राहते आणि रणबीर कपूरचं म्हणाल तर तो त्याची लेडी लव्ह आलिया भटसोबत राहतोय. मध्यंतरी आईला एकटं सोडून आलियासोबत राहायला गेल्यामुळे रणबीर ट्रोलही झाला होता. पण नंतर खुद्द नीतू यांनी यामागचं खरं कारण सांगितलं होतं. एकटं राहण्याचा निर्णय माझा स्वत:चा आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. माझी दोन्ही मुलं विदेशात होती. त्या काळात मी अधिक स्ट्रॉन्ग झाले होते.

पुढे त्या एकटेपणाची मला सवय झाली. ते येतात तेव्हा मला आनंद होतो. पण त्यांनी सतत सोबत राहणं गरजेचं नाही. संपर्कात राहा, कनेक्ट राहा पण सतत माझ्या अवतीभवती राहण्याची गरज नाही, असं मी त्यांना सांगते. मला माझं स्वातंत्र्य प्रिय आहे. माझं आयुष्य जसं आहे, तसं मला आवडतं, असं त्या म्हणाल्या होत्या.