जेव्हा स्वतःपेक्षा 20 वर्षे लहान ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत खरंखुर प्रेम करून बसली होती रेखा…

आपणा सर्वांना ठाऊकच आहे की बॉलिवूडमध्ये बरीच ह्रदये जोडली गेली आहेत आणि तितकीच तुटलेली देखील आहेत. काही जोडप्यांचे अफेअर इतके गाजले होते की ते मीडियामध्ये बराच काळ चर्चेचा विषय ठरले होते. पण काही प्रेम प्रकरण असेही राहिले आहेत ज्याची प्रेक्षकांना खबरही नव्हती. आज आपण अश्याच एका प्रेम प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत

बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत, ज्याची प्रेक्षकांना कल्पना देखील नाहीये. हे जग बाहेरून जितके सुंदर दिसते आतून मात्र तसे नाहीये हे सर्वांनाच माहीत आहे. बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेता-अभिनेत्रीची स्वतःची एक स्टोरी आहे. ज्या बर्‍यापैकी प्रसिद्ध आहेत.

परंतु सर्वात प्रसिद्ध म्हणजे अभिनेते आणि अभिनेत्रींच्या लव्हस्टोरीज. ज्याबद्दल अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध खिलाडी, अक्षय कुमार यांचे नाव एके काळी बर्‍याच अभिनेत्रींशी संबंधित होते. शिल्पा शेट्टीसोबतचे त्यांचे प्रेम प्रकरण सर्वांना माहीत आहेच. परंतु त्यांच्या आयुष्यात आणखी एका सदाबहार अभिनेत्रीचे नाव जोडले गेले होते ज्याची खबर खूप कमी लोकांना आहे.

अक्षय कुमार त्याच्या करिअरच्या सुरुवातीला त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असायचा. अक्षय कुमार त्याच्या बॉलिवूड मधील सुरुवातीच्या दिवसांमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशीपमध्ये होता. आणि हेच कारण होतं ज्यामुळे तो कायम चर्चेत असायचा.

रविना टंडन, शिल्पा शेट्टी, पुजा बत्रा अशा अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे प्रेम प्रकरण होते. पण त्याचे सर्वात जास्त गाजलेले फेअर म्हणजे अभिनेत्री रेखासोबतचे होते. अक्षय कुमार आणि अभिनेत्री रेखामध्ये खुप जास्त वयाचे अंतर आहे. जबवळपास 20 वर्षांचे. त्यामूळे त्यांचे हे प्रकरण विशेष गाजले. पण असेही म्हटले जाते की हे प्रकरण पूर्णपणे एकतर्फी होते ज्यात रेखा फक्त अक्षय वर प्रेम करत होती.

अक्षय कुमार आणि रेखा अगोदरपासूनच एकमेकांना ओळखत होते. पण ‘खिलाडियों का खिलाडी’ या चित्रपटाच्या शुटिंग वेळी या दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. रेखा आणि अक्षय कुमार एकमेकांसोबत डेट करू लागले.

अक्षय कुमार ज्यावेळी रेखाला भेटला. त्यावेळी तो रविना टंडनला डेट करत होता. पण रेखा आणि अक्षयची जवळीक पाहून रविना अक्षय कुमारपासून लांब गेली. त्यासोबतच या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि रेखाने अनेक बोल्ड सीन्स दिले होते.चित्रपटाच्या शुटिंग वेळी अक्षय कुमार आणि रेखाच्या आफेअरच्या चर्चा खुप जास्त वाढू लागल्या.

रेखा अक्षय कुमार पेक्षा वयाने खुप जास्त मोठ्या होत्या. त्यामूळे अक्षय कुमार नंतर नंतर दूर होण्याचा प्रयत्न करू लागला. रेखा मात्र अक्षय कुमारच्या प्रेमात वेडी झाली होती. तिला वय वगैरे या गोष्टीचा भान उरलं नव्हतं. त्यामूळे रेखा अक्षय कुमारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होत्या. पण अक्षय कुमारला मात्र हे नाते नको होते.

त्यामूळे तो रेखापासून लांब जाऊ लागला होता. खिलाडियों का खिलाडी चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला. रेखापासून लांब गेल्यानंतर अक्षय कुमारची भेट शिल्पा शेट्टीशी झाली. पण ते ही नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. शेवटी अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. नंतर मात्र अक्षय आणि रेखा पुन्हा एकत्र आले नाहीत.