अखेर रेखा यांचं दु:ख समोर; मी एक से’ क्स वेडी मुलगी, एक ब’ दनाम अभिनेत्री

इन आँखो की मस्ती… के…. असं नुसतं म्हटलं तरी समोर अभिनेत्री रेखा यांचा चेहरा उभा राहतो. रेखा यांनी अनेक भूमिका साकारल्या. त्यांच्या काही भूमिका प्रेक्षक आजही विसरले नाहीत. पण, मुळात त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षाही जास्त चर्चा झाली, ती म्हणजे खासगी आयुष्याची.

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं रेखा यांचं नातं सर्वश्रुत आहे. पण, या दोघांपैकी एकानंही कधीच या नात्यावर वक्तव्य केलं नाही. बच्चन यांच्याशी नाव जोडलं जाण्यापूर्वी रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली. जितेंद्र यांच्यासी असणारं रेखा यांचं नातं तुटलं आणि त्यानंर मेहरा यांच्याशी त्यांची जवळीक वाढली.

यासिर उस्मान यांच्या पुस्तकात यासंदर्भातला उल्लेख करण्यात आला आहे. जिथं रेखा विनोद मेहरा यांना प्रेमानं विन, म्हणत होत्या. त्या त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. त्यांच्यातले प्रेमाचे किस्से असेच चर्चेत आले आणि त्यांनी हळूहळू सार्वजनिक ठिकाणांवरही एकत्र जाण्यास सुरुवात केली.

कधी लाँग ड्राईव्ह, कधी ताजमध्ये डिनर डेट तर कधी तासन् तास गप्पांडे फड… असं हे नातं पुढे जात होतं. रेखा आणि विनोद यांचं नातं अतिशय सुरेखरित्या वळणं घेत होतं. पण, मेहरा यांच्या आईच्या नजरेत मात्र कधीच भक्कम स्थान मिळवू शकल्या नाहीत.

लग्नाआधीचे शा’ री’ रि’ क सं’ बं’ ध आणि लग्न झालेलं नसतानाही मातृत्त्वाबद्दल रेखा यांनी केलेलं वक्तव्य विनोद मेहरा यांच्या आईला मुळीच पटलं नव्हतं.

काय म्हणाल्या होत्या रेखा?

एका मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या, लग्नाआधीचे श’ री’ र सं’ बं’ ध ही काही नवी बाब नाही. एखाद्या महिलेनं लग्नाच्या पहिल्या रात्रीपर्यंतची वाट पाहावी, असं ते कुणी म्हणतं ते तथ्यहीन आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.

1973 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांनी सांगितल्यानुसार, ‘त्यांच्यासाठी (विनोद मेहरा यांच्या आईसाठी) मी फक्त एक अभिनेत्री नाही, तर एक ब’ द’ ना’ म अभिनेत्री होते, जिचा भूतकाळ अतिशय वाईट आहे. त्यांच्या नजरेत माझी ओळख ही से’ क्स साठी एक वे’ डी मुलगी इतकीच आहे. सुरुवातीला विनोदखातर त्यांनी मला सहन केलं. पण, आता मात्र त्या मला क्षणभरही सहन करत नाहीत. ‘

असं म्हटलं जातं की मेहरा आणि रेखा यांनी एका मंदिरात लग्न केलं होतं. लग्नानंतर ते मुंबईत आले आणि इथं मेहरा यांच्या घरी गेले. इथं येताच रेखा यांनी त्यांचा आईचा आशिर्वाद घेण्यासाठी म्हणून पायांना स्पर्श केला पण, त्यांनी रेखा यांना शि’ वी’ गा’ ळ केली. रेखा यांना यावेळी मा’ र’ हा’ ण’ ही झाल्याचा उल्लेख एका पुस्तकात करण्यात आला आहे.

मेहरा यांनी यावेळी रेखा यांचा आईपासून बचावही करत होते. पण, याचा फायदा झाला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार रेखा यांनी कधीच हे लग्न झाल्याचं स्वीकारलं नाही. वैयक्तिक आयुष्यात रेखा यांच्यासमोर असणारे हे प्रसंग नक्कीच त्यांचा अंत पाहणारे होते, असंच म्हणावं लागेल.