जेव्हा संजु बाबाच्या प्रेमात वेडी झाली होती ही सुप्रसिद्ध अभिनेत्री.. रोज रात्री करायची त्याच्या..

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असे पाहिले गेले आहे की प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या प्रेमसंबंधांमुळे चर्चेचा भाग बनलेला असतो असतो. आणि जर बॉलिवूड मधील च दोन कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले असतील तर अशा वेळी ते बातमीपत्रात थेट हेडलाईन गाठतात.अशा परिस्थितीत चित्रपटातील कलाकारांमधील नात्यांची चर्चा नेहमीच होत असते.

आताच्या काळात जरी अशा घटना कमी झाल्या असतील तरी 1990 च्या दशकात मात्र अशे प्रकरण सर्रास समोर येत असत. असे अनेक कलाकारांचे जोडपे एकमेकांच्या प्रेमात होते ज्यांनी तेव्हा जगासमोर मान्य नाही केलं.. परंतु आता काही वर्षांनी हे प्रकरण उघडकीस येत आहेत.

आज आम्ही तुम्हाला 90 च्या दशकातील अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने नुकताच एक असा किस्सा सांगितलं आहे ज्यातून तिच्या तेव्हा सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आणि ज्या व्यक्तीवर त्या अभिनेत्रीचे प्रेम जडले होते, तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा सुपरस्टार संजू बाबा उर्फ संजय दत्त.

आम्ही बोलत आहोत अभिनेत्री रविना टंडन बद्दल. रवीनाची बॉलिवूड मध्ये एंट्री इतकी सहज सोपी नव्हती. त्यासाठी तिला भरपूर कष्ट घ्यावे लागले. आपल्या परिवारातील कोणाचाही या क्षेत्रात दूर दूर पर्यंत संबंध नसतानाही तिने बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. रवीना बॉलीवूडच्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक आहे.

रविनाला लहानपणी अभिनयामध्ये रुची नव्हती परंतु तिला चित्रपट पाहायला फार आवडत असे. आणि त्याचे एकमवव कारण म्हणजे संजय दत्त. रवीना लहानपणापासूनच अभिनेता संजय दत्तची खुप मोठी फॅन होती. पण तिला अस कधीच वाटल नव्हत की ती संजय दत्तसोबत चित्रपटांमध्ये काम करेल.

रवीनाने नुकताच एका खाजगी मुलाखतीमध्ये या सर्व गोष्टींचा खुलासा केला होता. तिने सांगितले की, ‘लहानपणापासून खरं तर मला आधी ऋषी कपूर आवडत होते. मी त्यांचा एकही चित्रपट चुकवला नाहीये. परंतु त्यांच्या आणि माझ्या वयात खूप अंतर होते. त्यानंतर मला संजय दत्त खूप आवडायला लागले. संजय यांच्या दिसण्यापासून ते त्यांचा अभिनय या सगळ्यांचे मी अक्षरशः दिवानी झाले होते’.

रविनाचे संजय बद्दलचे प्रेम अगदीच शिखरावर होते. रवीनाने सांगितले की, ‘एकेकाळी तिने तिच्या पुर्ण रुमध्ये संजय दत्तचे फोटो लावले होते. ती झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतर सर्वात पहिले संजय दत्तला बघायची. तिचे म्हणणे होते की संजय ला बघितल्याशिवाय तिचा दिवस चांगला जात नसे. त्यामुळे तिचा हा दिनक्रम कायमचा होता.

अखेर रविनाच्या आयुष्यात तो दिवस उजाडलाच जेव्हा तिला आपल्या आवडत्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘जमाने से क्या डरना’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी रविनाची निवड झाली होती. या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून संजय दत्त भूमिकेत होता. रविनाला आपल्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता कारण तिचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं होतं.

रवीनाने तिचा आणि संजय दत्तचा ‘क्षत्रिय’ चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा सांगितला. ती म्हणाली की, क्षत्रिय चित्रपटाची शुटींग जंगलात सुरु होती. त्यावेळी मी हॉर्स रायडींग करत असताना माझा तोल जाऊन मी खाली पडले आणि बेशुद्ध झाले. अशा अवस्थेत संजय यांनी स्वतःच्या हाताने उचलून मला दवाखान्यात नेले.

.