अखेर इतक्या वर्षांनंतर रविना टंडनच दुःख आले बाहेर; म्हणाली, मी बाथरूम आणि स्टुडिओत जमिनीवर…

‘KGF Chapter 2’ च्या यशानंतर, या चित्रपटात दिसणारे सर्व स्टार्स खूप आनंदी आहेत आणि चित्रपटाच्या सक्सेसचा आनंद घेत आहेत. यश व्यतिरिक्त या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात संजय दत्त आणि रवीना टंडन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून दोघांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

रवीना टंडन या चित्रपटात रमिका सेनच्या भूमिकेत खूप च भारी दिसली. आता चित्रपटाच्या यशानंतर रवीना टंडनने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या करिअरशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे.

रवीना टंडनने नुकतीच एक मुलाखत दिली ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या करिअरबद्दल स्पष्टपणे सांगितले.  या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की, करिअरच्या सुरुवातीला ती स्टुडिओत साफसफाई करायची. तिथे ती बाथरूम साफ करायची, त्यात तिला उलटी देखील साफ करायला लागत. यासोबतच रवीनाने हेही सांगितले की, तिने फिल्मी दुनियेत प्रवेश कसा केला?

रवीना टंडन पुढे म्हणाली, ‘स्टुडिओमध्ये साफसफाईचे काम करून मी माझ्या करिअरची सुरुवात केली हे खरे आहे.  माझे काम बाथरूम आणि स्टुडिओच्या मजल्यावरील उलट्या साफ करणे हे होते. मी प्रल्हाद कक्करला दहावी सोडल्यानंतर मदत करायला सुरुवात केली. त्यावेळी लोक मला बघायचे आणि म्हणायचे की तु कॅमेऱ्याच्या मागे काय करत आहे.

तू तर पुढे असायला हवे. त्या लोकांना मी नेहमी म्हणायचे की नाही, नाही, मी, आणि अभिनेत्री? कधीच नाही.’ रवीना टंडननेही या मुलाखतीत सांगितले की, ती चुकून या इंडस्ट्रीत आली आहे. अभिनेत्री म्हणाली की, मी आज या इंडस्ट्रीत बाय डिफॉल्ट आहे. मोठी झाल्यावर मी अभिनेत्री होईल असे मला कधीच वाटले नव्हते.

रवीना टंडन पुढे म्हणाली, ‘जेव्हा प्रल्हादच्या सेटवर मॉडेल येत नसे, तेव्हा तो मला नेहमी सांगायचा आणि मग मी मेकअप करून मॉडेल्सप्रमाणे पोज देत असे. एकदा वाटलं की हे सगळं करायचंच आहे तर मग प्रल्हादसाठी फुकट पुन्हा पुन्हा का करायचं.  मला त्यातून थोडे पैसे तर मिळाले पाहिजे.

त्यानंतरच मी मॉडेलिंगला सुरुवात केली आणि नंतर हळूहळू मला काम मिळू लागले. जेव्हा मला चित्रपट मिळू लागले तेव्हा मला अभिनय माहित नव्हता पण मी सर्व काही शिकले.