‘रात्रीस खेळ चाले’ च्या तिसऱ्या भागातील अभिरामची बायको नक्की आहे तरी कोण.? खऱ्या आयुष्यात आहे इतकी सुंदर फोटोज होतायत व्हायरल..

झी मराठी आणि मराठी माणूस यांच्यात एक अतूट नातं आहे. झी मराठी वर अश्या अनेक सीरिअल्स आल्या आहेत ज्या संपून एक मोठा काळ उलगडला तरीही अजूनही त्या प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा भाग नुकताच संपला. ही मालिका अतिशय प्रसिद्ध झाली ती अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या गाजलेल्या लव्ह स्टोरीमुळे.

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या पाहिल्या आणि दुसऱ्या भागाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर झी वाहिनीने नुकताच ‘रात्रीस खेळ चाले’चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या भागामध्ये काय स्पेशल असणार आहे याची हुरहूर सर्व चाहत्यांना लागली आहे.

मालिकेची सुरुवात नुकतीच झाली असून आतापर्यंत त्यात मोजकीच पात्रं दाखवण्यात आली आहे. हळू हळू एक एक पात्र एन्ट्री घेऊन मालिका रंजक बनत चालली आहे. अण्णा नाईक यांच्या धाकटा मुलगा अभिराम, त्याच्या परदेश दौऱ्यावरन परत आलेला दाखवण्यात आला आहे. आणि तो व त्याची पत्नी दोघे अण्णा नाईकांच्या वाड्यावर आले आहेत.

या सर्व कथानकात एका व्यक्तीने सर्वांचं लक्ष वेधले आहे ती म्हणजे अभिरामची पत्नी. अभिरामने परदेशात जाऊन तिथे आपल्यासोबत राहत असलेल्या एका दक्षिण भारतीय मुलीसोबत लग्न केले आणि तिला यो माघारी आपल्या मूळ गावी घेऊन आला असे आतापर्यंत दाखवण्यात आले. तिचे सौंदर्य आणि अदाकारी पाहून सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा आहे.

एक सुपरिचित चेहरा यानिमित्ताने आपल्याला मालिकेतून पदार्पण करताना दिसतो आहे. मालिकेतील ही व्यक्तिरेखा साकार करणारी अभिनेत्री म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी भाग्या नायर. भाग्या हिला आपण itsuch या युट्यु’ब चॅनेल वरील वेबसिरीज मधील भूमिकांतून वारंवार पाहिलं आहे.

itsuch हे चॅनेल आणि त्यांच्या वेबसिरीज जशा लोकप्रिय आहेत त्याचप्रमाणे यातील कलाकार सुदधा. भाग्या ही या कालाकारांपैकी एक मुख्य कलाकार. भाग्या हिला अभिनयाची आवड पहिल्यापासून. तिने महाविद्यालयीन काळात अनेक एकांकिका स्पर्धांतून स्वतःतील अभिनयाच्या कलागुणांना वाव दिला.

तिचा सहभाग असलेल्या अनेक एकांकिकांनी पारितोषिकं ही पटकावली आहेत. सुंदरी, दादाची रक्षण सेना, उत्खनन या तिची भूमिका असलेल्या काही नाट्यकृती. यापैकी सुंदरी या नाटकातील तिच्या भूमिकेसाठी तिला पारितोषिकही मिळालेलं आहे. रंगभूमीवर वावरत असताना तिने नवमाध्यम असणाऱ्या वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्स मध्येही काम केलेलं आहे.

वर तिने अभिनित केलेल्या वेबसिरीज चा उल्लेख झालाच. तसेच तिने क्षणिक ही हिंदी शॉर्ट फिल्मही केलेली आहे. त्यात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकार केली होती. तसेच itsuch च्या who’s next या शॉर्ट फिल्म मध्येही काम केलं होतं. एका अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या शॉर्ट फिल्मचा १४ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

अभिनयासोबतच भाग्या ही उत्तम नृत्यांगना ही आहे. तिने भरतनाट्यम चे प्रशिक्षण घेतलेले आहे. तसेच तिने अनेक उत्तम ब्रँड्स साठी मॉडेलिंग केलेलं आहे. महाविद्यालयीन जीवनात कलाक्षेत्रासोबतच भाग्या ही खेळातही अग्रेसर होती. आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी भाग्या ही ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत दाखल होणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सुखद धक्काच.

आजतागायत आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणारी भाग्या या मालिकेतही उत्तम अभिनय साकार करत तिची व्यक्तिरेखा संस्मरणीय करेल हे नक्की.