अखेर रश्मिका चा त्याच्या सोबतचा ‘रोमांस’ जगासमोर; कोण आहे तो

दाक्षिणात्य सौंदर्यवती आणि कलाजगतामध्ये सध्याच्या घडीला National Crush म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं सध्या संपूर्ण जगात तिची जादू दाखवून दिली आहे. रश्मिकाच्या खासगी आयुष्याबद्दलही बरीच चर्चा झाली. ही चर्चा होती, अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत असणाऱ्या तिच्या रिलेशनशिपची.

रश्मिका आणि विजयमध्ये असणारं नातं हे मैत्रीच्याही पलीकडे जाणारं आहे, असं म्हणत अनेकांनीच त्यांच्या नात्याच्या भविष्याचे संकेत दिले. 

खऱ्या आयुष्यात ही जोडी एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. किंबहुना याबाबत त्यांचे काही बेत असतील तर ते ओघाओघाने जगासमोर येतीलच. तूर्तास विजय आणि रश्मिका त्यांची एकत्र केमिस्ट्री एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार पॅन इंडिया रिलीज असणाऱ्या ‘लायगर’ या चित्रपटातून रश्मिका झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिचा एक आयटम नंबर सादर करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. 

विजयसोबत रश्मिका यावेळी रोमान्स करताना दिसेल यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलं आहे. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीच्या बाबतीत भल्याभल्या जोड्यांना मागे टाकणाऱ्या या जोडीचा नवा अंदाज कसा असेल याचीच उत्सुकता सर्वांमध्ये पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेसुद्धा विजयसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तिथं अनन्याची वर्णी आणि आता इथं रश्मिकाची एंट्री असतानाच विजयसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी आतुर असणाऱ्या अभिनेत्रींचा यामुळं जळफळाट झाला असेल असंच म्हणावं लागेल.