एकेकाळची टॉप टीव्ही अभिनेत्री आता झालेय बेरोजगार.. काम मागायला गेल्यावर करतात ‘या’ गोष्टीची मागणी..

अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत कलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.

पण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. पण काही कलाकार असे होते ज्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जिने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सीरिअल्स मधून केली.

नंतर आपल्या अदाकारीच्या जोरावर ती चित्रपटां मध्ये ही झळकली. पण आता मात्र ती पडद्यापासून दूर असून कामाच्या शोधात आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ही सुंदरी..

उतरण मालिकेतील टप्पू म्हणजेच तपस्या आठवतेय का ? तपस्या म्हणजेच रश्मी देसाई ही छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु असे असूनही विविध मालिकांमधून तब्बल एक दशक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी रश्मी आजही कामाच्या शोधात आहे हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल.

होय, ही गोष्ट खरी आहे आणि याच खुलासा खुद्द रश्मी नेच एका मुलाखतीत केला आहे. उत्तम अभिनय क्षमता असतानाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी तिला अद्याप मिळालेली नाही. काम मागायला गेल्यास चित्रपट निर्माते, दिग्दर्शक टिव्ही कलाकारांना आम्ही काम देत नाही असं म्हणून अपमान करतात असा खळबळजनक आरोप तिनं केला आहे.

‘उत्तरन’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रश्मी आपल्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध आहे. अलिकडेच तिनं एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरबद्दल खुलासा केला. त्या मुलाखतीत तिला पुढील प्लॅन्स बद्दल आणि बॉलिवूड मध्ये केव्हा पदार्पण कासणार असं विचारलं गेलं.

त्यावेळी तिनं आपल्या करिअरमधील हा थक्क करणारा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “ बॉलिवूडमध्ये आजही टीव्ही कलाकारांना कनिष्ठ दर्जाचे कलाकार असं समजलं जातं. वारंवार आमचा टीव्ही कलाकार म्हणून वेगळी वागणूक दिली जाते. मी अनेकदा बॉलिवूड चित्रपटांच्या ऑडिशनला गेले आहे.

मात्र ऑडिशन पास करुनही काम मिळत नाही कारण आम्ही टीव्हीचे कलाकार आहोत. तर कधी काम हवं असेल तर बदल्यात पैशाची मागणी देखील केली जाते. मालिकांमध्ये काम करणाऱ्यांनी बॉलिवूड मध्ये येऊच नये असं बॉलीवूड लॉबीला वाटतं. टीव्ही कलाकारांनि आयुष्य भर तिथंच काम करावं या ठिकाणी प्रयत्न करु नये असं म्हणत आमचा अपमान केला जातो.

आणि हे फक्त माझ्यासोबतच घडतंय असं नाही. माझे अनेक सहकलाकार देखील हाच प्रॉब्लेम फेस करत आहेत. परंतु यांना कळायला हवं की आम्हाला देखील काम करण्याचा पुर्ण अधिकार आहे. चित्रपटांमध्ये नव्या अभिनेत्रींना संधी दिली जाते अन् आम्ही वर्षानुवर्ष काम करतोय आमच्यात क्षमता आहे.

आम्ही देखील ग्लॅमरस दिसतो तरी देखील आमच्यासोबत भेदभाव केला जातो. असा अनुभव घेऊन आता मी थकले आहे.” रश्मीनं 2002 साली कन्यादान या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने आपला मोर्चा भोजपुरी सिनेमात वळवला. गजब भली रामा, नदिया के तीर, कब हो गुनाह हमार, पप्पू से प्यार हो गई यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये ती झळकली.

दरम्यान 2008 साली तिनं रावण या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. रावण या मालिकेमध्ये तिनं मंदोदरी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती उत्तरण या मालिकेमुळं. मालिकेंसोबतच तिनं बिग बॉस, झलक दिखलाजा, नच बलिये यांसारख्या रिअलिटी शोंमध्ये देखील भाग घेतला आहे.

मात्र इतका अनुभव असताना देखील तिला अद्याप बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळालेली नाही.