रणवीर सिंग ने कॅमेरा समोरच सुरू केले होते असे ‘चाळे’, दीपिकाने रागाने धरला…

दिपिका आणि रणवीर च्या लग्नाला आता जवळपास चांगलाच कालावधी उलटलाय , आणि ही जोडी नेहमीच त्यांच्या सुंदर फोटो व आपसातल्या केमिस्ट्री मुळे सोशल मिडीयावर ट्रेंडींगला असते . पण रणवीर यावेळी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

तो असा म्हणालाय की त्याने जेव्हा पहिल्यांदा दिपीकाला मिठी मारली तेव्हा ति त्याला सगळ्यांसमोर चिडून ओरडली होती. रणवीर सिंग ही घटना आठवताना म्हणाला मी जेव्हा २०१५ साली मी बाजीराव मस्तानी चित्रपटाचे प्रमोशन करत होतो तेव्हाची ही गोष्ट आहे.

मी त्यावेळी अगदी पळत जाऊन दिपिकाची गळाभेट घेतली होती. त्यानंतर ती चिडून म्हणाली तू मला कॅमेरा समोर अशा पद्धतीने मिठी मारणार का, त्यावेळेस ती खुप चिडली होती हे ही रणवीरसिंह ने न विसरता सांगितले. त्यानंतर त्याने दोघांच्या काही चांगल्या आठवणीही मिडियाला सांगितल्या.

रणवीर सिंग ने दोघांच्या चांगल्या आठवणी सांगताना सांगितले की “जरी आमच्या लग्नाला ४ वर्षे झाली असली तरी आजही मला आमचं नातं तितकंच ताजतवानं आहे असं वाटतं ति माझ्यासाठी कधी गोड असते तर कधी तिखट असते पण ती माझ्या सर्व काही आहे.

मला असं वाटतं माझी प्रेयसी माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे ,व ती कायम माझ्यासोबत आहे हे आठवून चांगलं वाटतं.” या नंतर पत्रकारांने जेव्हा मुलांविषयी प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला , “जेव्हा दिपिका कान्स वरून परत येईल तेव्हा तिलाच हा प्रश्न विचारा “.

कान्स फेस्टीवल 28 मेला समाप्त झाला आहे व दिपिका पादुकोण सोमवारी सकाळीच मुंबईला आली आहे.