घटस्फोट न घेताच आपल्या पतीपासून दूर राहतेय ‘कपूर’ घराण्याची ही सून.. अधून मधून घेते पतीची भेट..

बेबो आणि लोलोची आई बबिता कपूर यांचा आज 74 वा वाढदिवस. बबीतांच्या दोन्ही लेकी बेबो (करिना कपूर)आणि लोलो (करिश्मा कपूर) लोकप्रिय अभिनेत्री आहेत. एकेकाळी बबिता यांचाही असाच दबदबा होता. पण करिअरऐवजी बबिता यांनी प्रेम निवडलं. रणधीर कपूर यांच्याशी लग्न झालं आणि कपूर घराण्याच्या या सूनेनं करिअर सोडून घर सांभाळणं पसंत केलं.

1971 मध्ये बबिता यांनी रणधीर कपूर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. दोघांची ओळख 1960 मध्ये ‘संगम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर भेटी वाढत गेल्या आणि रणधीर कपूर व बबिता एकमेकांच्या प्रेमात पडले. 6 नोव्हेंबर 1971 रोजी दोघांनी लग्न केलं. खरं तर लग्नानंतर बबिता यांना चित्रपटांत काम करायला आवडलं असतं. पण तेव्हा कपूर घराण्यातील लेकी सूनांना चित्रपटात काम करण्यास मनाई होती. बबितांनी कपूर घराण्याचा हा नियम मान्य करत, चित्रपटांना रामराम ठोकला.

पुढे रणधीर व बबिता दोघांना करिश्मा आणि करिना मुली झाल्या. पण अचानक असं काही बिनसलं की बबिता रणधीर यांच्यापासून वेगळ्या झाल्यात. 34 वर्षांपासून बबिता रणधीर यांच्यापासून वेगळ्या राहत आहेत. अर्थात आजही त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. 1974 मध्ये करिश्माचा जन्म झाला तोपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण 80च्या दशकात रणधीर यांच्या फिल्मी करिअरला उतरती कळा लागली होती. 1981 मध्ये करिनाच्या जन्मापर्यंत रणधीर यांच्यावर फ्लॉप हिरोचा शिक्का बसला होता.

करिअरमधील या अपयशानं रणधीर नैराश्यात गेले. त्यांना दारूचं व्यसन जडलं. मग उरलं सुरलं करिअरही संपलं. रणधीर यांच्या याच सवयीला कंटाळून बबितांनी एकदिवस घर सोडलं. 1987 मध्ये बबिता दोन मुलींना घेऊन घराबाहेर पडल्या. त्यांनी एकटीने दोन्ही मुलींचा सांभाळ केला. करिश्माला चित्रपटांत काम करायचं होतं, तेव्हा बबिता लेकीच्या पाठी खंबीरपणे उभ्या झाल्या. करिनालाही त्यांनी ठाम पाठींबा दिला.

अनेकवर्ष रणधीर यांनी बबितांशी अबोला धरला होता. अर्थात याऊपरही बबिता वा रणधीर यांनी एकमेकांना घटस्फोट दिला नाही. एका मुलाखतीत रणधीर यांनी या निर्णयामागचं कारण सांगितलं होतं. ्न‘आम्ही घटस्फोट घेणार नाही. मला किंवा बबिताला दुसरं लग्न करायचं नाही. मग आम्ही घटस्फोट का घेऊ?,’असं ते म्हणाले होते.

आजही बबिता व रणधीर कपूर वेगळं राहतात. अर्थात आयुष्याच्या या टप्प्यावर नात्यातील कटुता संपली आहेत.मतभेद गळून पडले आहेत. त्यामुळे रणधीर व बबिता अनेकदा एकत्र दिसतात.