लग्नानंतर आलिया भट्ट ने दिली गुडन्यूज, रणवीर सोबत घरातील सर्वच सदस्य आहेत खूप आनंदी

अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली आलिया भट्ट आता प्रॉडक्शन हाऊसमध्ये आपली प्रतिभा दाखवणार आहे. होय, आलिया आता निर्माती बनली आहे. ती लवकरच तिच्या प्रॉडक्शन हाऊस मध्ये बनवल्या जाणाऱ्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटात दिसणार आहे.

‘डार्लिंग्स’ हा चित्रपट शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि आलिया भट्टचे प्रोडक्शन हाऊस इटर्नल सनशाइन प्रोडक्शन यांच्या बॅनरखाली बनला आहे. आलियाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती तिच्या डार्लिंग चित्रपटाच्या स्टार कास्टसोबत दिसत आहे.

आलिया भट्टशिवाय या चित्रपटात रोशन मॅथ्यू शेफाली शाह आणि विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के. रेन यांनी. रणबीर कपूरसोबत लग्नानंतरचा हा आलिया भट्टचा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे.

आलिया नेटफ्लिक्सवर येणार आहे

आलिया भट्टच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ दरम्यान, ‘डार्लिंग्स’ चित्रपटाचे स्टार लोक ही गोष्ट लपवताना दिसले आणि व्हिडिओमध्ये, जेव्हा कोणीतरी आलियाला विचारले की हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येईल की नाही, तेव्हा आलियाने उलटसुलट उत्तर दिली पण शेवट पर्यंत व्हिडिओत याची पुष्टी झाली नाही.

‘डार्लिंग्स’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची पुष्टी आधीच झाली आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत आलिया भट्टने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लवकरच भेटू’. हा व्हिडिओ पोस्ट होताच आलिया भट्टवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आलिया भट्ट सध्या तिचा हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.