अभिनेत्रीचा राज कुंद्रा वर खळबळजनक आरोप.. ‘ड्र-ग्स देऊन आमचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केले जात होते आणि…’,

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉ-र्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉ-र्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. आता अभिनेत्री श्रुति गेराने आणखी काही खुलासे केले आहेत. तिने सांगितलं की नवीन अभिनेत्रींना ड्र-ग्स देऊन त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केले जातात आणि त्यानंतर त्यांना पॉ-र्न चित्रपटांमध्ये काम करायला भाग पाडले जाते.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, श्रुतिला २०१८ मध्ये एका कास्टिंग दिग्दर्शकाने राज कुंद्राच्या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी विचारल्याचे तिने सांगितले. “मला कोणत्या कास्टिंग डायरेक्टर्सने फोन केला होता हे आठवत नाही. मात्र, एकाने मला सांगितले की तो माझी ओळख राज कुंद्राशी करून देईन, दुसऱ्याने सांगितले की राज त्याचं प्रोडक्शन हाऊस सुरु करण्याचा विचार करत आहे आणि तो वेब सीरिज सुरु करणार आहे.

मी लगेच नाही म्हणाले. तेव्हा मी नाही म्हणाली यासाठी आता मी स्वत:ची आभारी आहे. आम्हाला सगळ्यांना वाटलं की तो एक चांगला आणि मोठा माणूस आहे पण तो तर अ-श्ली-ल चित्रपट बनवतो,” असे श्रुतिला म्हणाली.

‘हॉ-टशॉ-ट्स’ला पर्याय म्हणून राज नवीन अॅप लॉन्च करणार होता.या नवीन एपवरील चित्रपटासाठी राजनं त्याची मेव्हणी शमिता शेट्टी तसंच मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या नावाचा विचार केला होता. असा दावा गहना वशिष्ठ हिनं नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. त्यामुळं एकंच खळबळ उडाली आहे.

राज कुंद्राला अटक होण्याच्या काही दिवसांपूर्वीच आमची त्याच्या ऑफिसमध्ये भेट झाली होती. त्यावेळीच मला त्याच्या नवीन ‘बॉलिफेम’ या अॅप बद्दल समजलं होतं. या अॅपवर चॅट शो तसंच रिअॅलिटी शो , फिचर फिल्म , म्युझिकल व्हिडिओंचा समावेश असणार होता.

याबद्दल आमचं बोलणं झालं होतं. त्यात कोणताही अ-श्ली-ल किंवा बोल्ड मजकूर नसणार होता. असंही गहनानं स्पष्ट केलं आहे. या अॅपसाठीच्या एका चित्रपटासाठी त्याची मेव्हणी शमिता शेट्टी तर आणखी एका चित्रपटासाठी सई ताम्हणकरला कास्ट करण्याचा विचार होता. असं गहना म्हणाली

गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पथकाने मढ बीचवरील एका बंगल्यात छापा टाकून पॉ-र्न प्रोडक्शन कंपनीचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी धड टाकली त्यावेळी एका अ-श्ली-ल व्हिडिओचे चित्रीकरण सुरु होते. पोलिसांनी बंगल्यातून बॉलिवूड क्षेत्राशी संबंधित अभिनेता, फॅशन डिझायनर आणि कॅमेरामन यांना अटक केली.

हिंदी आणि तेलगू सिनेमा आणि विशेषकरून जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या गेहाना वसिष्ठ हिचा सहभाग यामध्ये आढळल्यानंतर तिलाही अटक करण्यात आली. तेव्हापासून गुन्हे शाखा या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करीत होती. हे अश्लील चित्रपट आणि वेब सिरीज बनविण्यासाठी अर्थपुरवठा राज कुंद्रा याच्याकडून होत असल्याचा संशय पोलिसांना होता. याबाबतचे ठोस पुरावे हाती लागल्यानं कुंद्रा याला अटक करीत असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.