समोर आलं लग्नाआधीच मुकेश अंबानींच्या सुनेचं खरं रुप; Viral Photo पाहून म्हणाल, बाबो हे काय आहे…

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबही खूप लोकप्रिय आहे. नीता अंबानींनीही व्यावसायिक क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. तर दुसरीकडे ईशा अंबानी आपल्या मोहक स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

तसंच अंबानी घराण्याच्या सुनांचाही स्टायलिश अवतार सोशल मीडियावर पाहायला मिळतो.देशातील सर्वात धनाढ्य कुटुंबापैकी एक, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबानी कुटुंबाचा वृक्ष आता वाढताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी अंबानींचा मुलगा आकाश अंबानी यानं लग्नगाठ बांधली.

यानंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे त्यांचा दुसरा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाची. अनंत अंबानीचं लग्न झालं नसलं तरीही त्याच्या आयुष्यात असणाऱ्या ‘त्या’ एका मुलीची चर्चा आता जोर धरु लागली आहे. मुख्य म्हणजे अंबानी कुटुंबानं तिचा सून म्हणून केव्हाच स्वीकारही केला आहे.

अंबानी कुटुंबात काहीही कार्यक्रम असो, एखादा विवाहसोहळा असो किंवा आणखी काही. राधिका कायमच या कुटुंबासोबत मिसळताना दिसते. यंदाच्या वर्षी राधिका आणि अनंत यांचं लग्न होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. लग्न होऊन अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वीच राधिकाचे काही बोल्ड फोटोही समोर आले आहेत.

यापैकी काही फोटोंमध्ये राधिका एका सुरेख ऑफशोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या हातात स्टॉकिन्सही घातल्याचं दिसत आहे. राधिकाचे हे फोटो सोशल मीडियावर अनेकांच्याच नजरा वळवत आहेत. एरव्ही अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमांमध्ये राधिकाला अनेकदा भारतीय किंवा इंडोवेस्टर्न लूकमध्ये पाहिलं गेलं आहे.

पण, तिचे हे पूर्णपणे पाश्चिमात्य कपड्यांतील फोटो आता चर्चेचा विषय ठरत आहेत. असं म्हटलं जातं की, राधिका आणि अनंत या दोघांनीही एकमेकांचा पूर्ण मनानं स्वीकार केला आहे. तेव्हा आता त्यांच्या या नात्यात लग्नाची औपचारिकता केव्हा पूर्ण होणार याकडेच अनेकांचं लक्ष आहे.