प्रियंका चोप्रा आपल्या बाळाला अमेरिकेतच देणार जन्म.. भारतात नकोच कारण..

बॉलिवूड मध्ये चर्चेत राहण्यासाठी कलाकार काय काय करतील ह्याचा काही नेम नाही. आता कोरोनाकाळात तर चित्रपट प्रदर्शित होत नाहीयेत तर अश्या वेळी चर्चेत राहण्यासाठी अशे प्रकार सर्रास घडत आहेत. अश्याच एका घटनेने सध्या बॉलिवूड मध्ये खळबळ माजली होती, ते म्हणजे एका अभिनेत्रीने दिलेल्या धक्कादायक विधानामुळे.

या जगात पालक होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे. कारण एखादे मुल असल्याशिवाय माणसाचे कुटुंब आणि आयुष्य अपूर्ण दिसते. बॉलिवूड मधील अनेक सुप्रसिद्ध जोडपे देखील आता फॅमिली प्लॅनिंग च्या तयारीत दिसत आहेत. नुकतंच अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या जोडप्याने एका सुंदर कन्येला जन्म दिला.

तसेच तैमुर नंतर आता करीनाही दुसऱ्यांदा आई होण्याच्या तयारीत आहे. व लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. अशा वातावरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्र्या आहेत, ज्यांनी नुकतंच लग्न केलंय, त्यांच्याकडे आता सर्वांची नजर रोखून लागली आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे प्रियंका चोप्रा.

सध्याच्या काळात बॉलिवूड मध्ये टॉपला गणल्या जाणाऱ्या अभिनेत्र्यां पैकी एक नाव म्हणजे प्रियांका चोप्रा. आपल्याला माहित आहे कि प्रियंका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. प्रियंका आपल्या शानदार अभिनयाप्रमाणेच फिटनेस, फिगर आणि सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

2 वर्षां पूर्वी तिने स्वतःपेक्षा १० वर्षे लहान असलेल्या निक जोनससोबत लग्नगाठ बांधली होती त्यानंतर या लग्नाची खूप चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगली होती. आता अशीच एक चर्चा रंगत आहे ती म्हणजे प्रियंकाच्या आई होण्याबद्दलची चला तर मग जाणून घेऊ कि प्रियंकाने फॅमिली प्लानिंग बद्दल काय म्हंटले आहे.

पण प्रियंकाने नुकतेच एका खाजगी मुलाखतीत असे म्हंटले होते कि मला देखील लवकरच आई होण्याची खूप इच्छा आहे पण आम्ही दोघे सुद्धा व्यस्त असल्यामुळे आम्ही दोघे सुद्धा एकमेकांना वेळ देण्यात असमर्थ आहोत. तपण येत्या काही दिवसांतच आम्ही आमच्या कुटुंबासाठी वेळ काढून आम्ही आमच्या फॅमिली प्लॅनिंग बद्दल निर्णय घेणार आहोत.

तसेच तिने आपल्या बाळंतपणाबद्दल असलेल्या काही इच्छा देखील जाहीर केल्या. तिची अशी इच्छा आहे कि तिच्या बाळाचा जन्म हा लॉस एंजल्समध्येच व्हावा, कारण प्रियांकाचे ते सर्वात आवडते शहर आहे आणि तिच्या मते तीचे आणि तिच्या बाळाचे मानसिक तसेच शारीरिक संगोपन भारतापेक्षा अमेरिकेत चांगले होईल असावं तिला वाटत आहे.

या मुलाखतीत तिने आपल्या पुढच्या प्रोजेक्ट्स बदसल देखील खुलासा केला. प्रियंका लवकरच ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची कथा अरविंद अदिगा यांच्या ‘द व्हाइट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. यात अभिनेता राजकुमार राव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

प्रियांका चोप्राचा जन्म झालाय झारखंडमध्ये. वडील पंजाबी तर आई झारखंडची. वडील आर्मीत असल्यामुळं त्यांच्या कुटुंबाला सतत फिरतीवर राहावं लागायचं. तिचं शिक्षण बरेल, न्युटन, लोवा अशा विविध ठिकाणी झालं. मध्येच ती अमेरिकेतही होती. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणसाठी तिनं मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर तिनं महाविद्यालय सोडून दिलं.

प्रियंकाच्या आईनं तिचे फोटो मिस इंडिया स्पर्धेसाठी पाठवले. तिला या स्पर्धेसाठी जेंव्हा कॉल आला, तेंव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला होता. अभ्यासात ब्रेक म्हणून प्रियंका या स्पर्धेत सहभागी झाली. २००० ची ‘फेमिना मिस इंडिया’२००० ची ती उपविजेती ठरली. त्यानंतर त्याच वर्षी तिनं ‘मिस वर्ल्ड २०००’ हा किताबही जिंकला. त्याच वर्षी भारताची लारा दत्ता आणि दिया मिर्झा यांनीही ‘मिस युनिव्हर्स’ आणि ‘मिस एशिया पॅसिफिक’ हे किताब जिंकले होते.