लग्न होण्यापूर्वीच मूल जन्माला घालणार होती प्रियांका चोप्रा, आईने नकार दिला..

आत्ताच आई बनलेली बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ‘देसी गर्ल’ प्रियांकाने नुकतेच तिच्या आणि निक जोनासच्या मुलीचे नाव सर्वांसमोर शेअर केले आहे.

अभिनेत्रीने तिच्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनस’ ठेवले आहे, जे तिच्या आईचे नाव आहे. प्रियांका चोप्राच्या आईचे नाव मधुमालती चोप्रा आहे. प्रियांका चोप्राचे तिच्या आईवर खूप प्रेम आहे, ती आईच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करते. सरोगसीच्या माध्यमातून आई बनलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक मोठा खुलासा केला आहे, हे कळल्यानंतर बॉलिवूडमध्ये तिची चांगलीच चर्चा रंगली आहे.

प्रियंका आणि तिचा पती निक जोनस यांनी पालक होण्यासाठी सरोगसी मार्गाचा अवलंब केला, परंतु अभिनेत्रीने सांगितले की तिला लग्नापूर्वी एक मूल दत्तक घ्यायचे होते. एकदा तिने या संदर्भात आई मधुमालती यांच्याशीही चर्चा देखील केली पण त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. अभिनेत्रीच्या आईने तिला तसे करण्यास मनाई केली होती.

कोणीतरी आपल्या बाळाला सोडून गेले होते

खरं तर, ही गोष्ट त्यावेळे ची आहे जेव्हा प्रियांका चोप्राचा भाऊ सिडचा जन्म झाला होता. रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर प्रियंका तिच्या आईसोबत घरी येत असताना तिला लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. नंतर कोणीतरी मुलीला सोडून गेल्याचे दिसून आले. त्या रात्री प्रियांकाला मुलीला सोबत घेऊन जायचे होते पण तिच्या आईने तसे करण्यास नकार दिला.

ती म्हणाली की आपण हे करू शकत नाही. त्यानंतर आईने ते मूल अश्या जोडप्याला दिले ज्याला आधी मूल नाहीये.2018 मध्ये प्रियांकाने हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार शाही पद्धतीने लग्न केले होते. तिचा नवरा निक जोनस हा अमेरिकन गायक आहे.

प्रियंका तिच्या पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर तीन वर्षांनी सरोगसीच्या माध्यमातून दोघांनाही मुलगी झाली आहे.