पहिल्या पत्नीला वाऱ्यावर सोडून हा अभिनेता-दिग्दर्शक करतोय आता स्वतःच्या भाचीसोबत लग्न..

बॉलीवूड आणि त्यामधील होणारी लग्ने, हा कायमच चर्चेचा विषय ठरलेली आहेत. या बॉलिवूड ने अनेक ऑन स्क्रीनसोबतच पडद्याआडच्या ही जोड्या आपल्या समोर आल्या आहेत. परंतु याच बॉलिवूड मधील होणारे काही विवाह वादग्रस्त ठरले. असाच एक विवाह होण्याच्या मार्गावर असून तो आता चर्चेचा विषय बनला आहे.

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक-निर्माता-अभिनेता प्रभु देवा वयाच्या 47 व्या वर्षी पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकतोय. लाजाळू स्वभावाचा प्रभु देवा कायमच वादांपासून दूर राहिलेला आहे. परंतु त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयी मात्र आता चर्चेचा जोरदार विषय झाला आहे.त्याला कारण आहे ते प्रभू देवा आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीमध्ये असलेलं नातं.

वृत्तानुसार प्रभू देवा आपल्या भाचीशी नातेसंबंधात आहे आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या पत्नीशी झालेल्या वादानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक वर्षे प्रभू देवाने एकटे पणात व्यतीत केले. पण आता मात्र प्रभू देवाने पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेता असल्याचे सांगितले जातेय.

प्रभूदेवाने 1995 साली रामलताशी लग्न केले होते. रामलता ही धर्माने मुस्लिम आणि शास्त्रीय नर्तक होती. रामलता यांनी लग्नानंतर हिंदू धर्म स्वीकारला होता. त्या दोघांनाही तीन मुले झाली. 2008 मध्ये त्याचा मोठा मुलगा विशाल यांचे क-र्क-रोगाने नि-धन झाले. घट-स्फो-टानंतर रामलता यांना मुलांचा ताबा मिळाला, परंतु प्रभुदेवाला आपल्या मुलांना भेटण्याची परवानगी होती.

प्रभूदेवाचे व्यावसायिक जीवन तितकेच विलासी आणि हसतमुख दिसते, तर त्याचे वैयक्तिक जीवन तितकेच अस्थिर आहे. त्यांचे लग्न मोडण्याचे मुख्य कारण हे एक्स्ट्रा मॅरेटल अफेअर हेच होते. आपल्या आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत ते एका ललनेच्या प्रेमात पडले आणि मग स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना गमावून बसले.

प्रभू देवाचे नाव दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री नयनताराशीही संबंधित होते. प्रभुदेवाने ‘विल्लू’ या तमिळ चित्रपटात नयनताराचे नृत्यदिग्दर्शन केले. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले. 2009 मध्ये नयनतारा आणि प्रभु देवा प्रेम संबंधात अडकले. सुरुवातीला दोघांनीही या नात्याचा विषय नाकारला, परंतु नंतर प्रभूने नयनताराबरोबरच्या संबंधांची बाब मान्य केली आणि लग्न करण्याचा मुद्दा बनविला.

रामलताला जेव्हा नयनतारा आणि प्रभुदेवाच्या नात्याबद्दल कळले तेव्हा रामलताने बरीच खळबळ उडाली. प्रभूने घटस्फोटासाठी अर्ज केला होता, परंतु रामलताने त्याला घटस्फोट देण्यास नकार दिला. उलटपक्षी तिने प्रभू देवाला धमकावले की जर त्यांने नयनताराशी लग्न केले तर ती उपोषणाला बसेल. या प्रकरणाची तेव्हा बरीच चर्चा झाली. त्यामुळे प्रभुदेवा साठी हा सर्व प्रकार डोकेदुखीचा ठरला.

२०१० साली लता यांनी फॅमिली कोर्टात याचिका केली होती की प्रभु देव नयनतारासोबत लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. बरं, २०११ मध्ये बर्‍याच गदारोळ आणि कोर्ट कचेरी नंतर रामलताने 16 वर्षांचा विवाह संपवला. परंतु प्रभुदेवा आणि नयनतारा मधील नातं ही काही फार काळ टिकलं नाही. एका वर्षातच म्हणजे 2012 मध्ये प्रभूदेवा-नयनतारा यांचं ब्रेकअप झालं.

पण आता हाती आलेल्या वृत्तानुसार, घटस्फोटाच्या नऊ वर्षानंतर आता प्रभु देवा आपली स्वतःची भाची शोभा याच्याशी डेट करीत आहे आणि लवकरच तिच्यासोबतच लग्न बंधनात अडकणार आहे. अद्याप या बातमीला प्रभुदेवांनी किंवा त्यांच्या टीमने दुजोरा दिला नाही. परंतु विचारले असता नकारही दिला नाहीये. पण हा विषय नक्कीच वादग्रस्त ठरणार आहे