पूनम ढिल्लोंच्या मुलीसमोर फिकी पडलीये सारा, पाहा तिचा सुपर स्टायलिश बॅकलेस टॉप लुक

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लो या त्यांच्या काळातील सर्वांत सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या. अभिनयाव्यतिरिक्त पूनम आपल्या अनोख्या स्टाइलसाठीही ओळखल्या जात असत. त्यांची लेक पलोमा थकेरियानंही याच गोष्टीचे धडे त्यांच्याकडूनच योग्य पद्धतीने घेतल्याचे दिसतंय.

सारा अली खान आपल्या मित्रमैत्रिणींसोबत वांद्रे येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये डिनर पार्टीसाठी पोहोचली होती. या पार्टीसाठी साराने स्टायलिश आणि कम्फर्टेबल पोषाखाची निवड केली होती. साराची ही स्टाइल तुम्ही देखील सहजरित्या फॉलो करू शकता.

साराने डिनर पार्टीसाठी क्लासिक कॉम्बिनेशनची निवड केली होती. तिनं पांढऱ्या रंगाचे टॉप परिधान केले होते. या टॉपमध्ये हायनेकसह बिशप स्लीव्ह्ज आपण पाहू शकता. टॉपच्या हेमलाइनवर आपण प्लीट्स डिझाइन देखील पाहू शकता. निळ्या रंगाच्या जीन्सवर साराने हा स्टायलिश टॉप घातला होता.

तिची ही जीन्स वॉश्ड पॅटर्न डिझाइनमधील होती.तसं पाहायला गेलं तर साराचा हा लुक क्लासिक होता. पण हा लुक अधिक आकर्षक दिसावा, यासाठी तिनं नियॉन गुलाबी रंगाची स्लिंग बॅग कॅरी केली होती. आउटफिटवर याच रंगाचे स्ट्रॅप हील्स देखील तिनं मॅच केले होते. तिच्या संपूर्ण लुकमध्ये हा रंग हाइलाइट होतोय.

एवढंच नव्हे तर साराने याच रंगाचे ईअररिंग्स देखील घातले होते.बऱ्याच दिवसांनंतर पूनम ढिल्लो सार्वजनिक ठिकाणी दिसल्या. यावेळेस सोबत त्यांची लेक सुद्धा होती. या अभिनेत्रीच्या स्टायलिश लेकीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. पलोमा थकेरियाने लेटेस्ट ट्रेंडनुसार आउटफिटची निवड केल्याचे आपण पाहू शकता.

पलोमाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता. या टॉपमध्ये आपण जूल नेकलाइनसह पफ्ड हाफ स्लीव्ह्ज पाहू शकता. या टॉपचा सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे बॅकलेस डिझाइन. यामध्ये लेस डिझाइन देखील आपण पाहू शकता.

या स्टायलिश टॉपवर पलोमाने फिकट निळ्या रंगाची स्किनफिट जीन्स परिधान केली होती आणि काळ्या रंगाचे हील्स आणि पर्स देखील मॅच केली होती.पूनम ढिल्लो यांनी देखील काळ्या रंगाचाच ड्रेस परिधान केला होता. नॅरो हेमलाइन पायजम्यावर त्यांनी प्लेन लुकमधील कुर्ता घातला होता.

ओढणीमुळे त्यांचा लुक अधिक हाइलाइट होतोय. या ओढणीमध्ये आपण वेगवेगळे रंग पाहू शकता. या आउटफिटमुळे पूनम ढिल्लो यांना मोहक लुक मिळाला होता.