आयुष्यातला पहिला किसिंग सीन देताना अशी झाली होती पूजा भटची अवस्था.. पण वडील महेश भट्ट यांनी दिली ट्रेनिंग आणि-

अभिनेत्री पूजा भटने  8 मार्चला रिलीज झालेल्या ‘बॉम्बे बेगम्स’ या वेबसीरिजमधून ओटीटीवर डेब्यू केला. पूजा या सीरिजच्या या प्रमोशनमध्ये बिझी असताना आणि याचदरम्यान तब्बल 30 वर्षानंतर तिने एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

होय, पहिल्यांदा संजय दत्तला किस करतानाची अवस्था तिने एका मुलाखतीत सांगितली.पूजाने वयाच्या 17 व्या वर्षी ‘डॅडी’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. हा सिनेमा पूजाचे वडील आणि दिग्दर्शक महेश भट यांनीच बनवला होता.

‘सडक’ हा पूजाच्या करिअरमधील तिसरा सिनेमा होता. यात तिने संजय दत्तसोबत स्क्रिन शेअर केली होती आणि याच सिनेमात तिने तिचा पहिला किसींग सीन दिला होता. हा सिनेमाही महेश भट यांनीच दिग्दर्शित केला होता.

तिने सांगितले, ‘मला संजय दत्तसोबत किसींग सीन द्यायचा होता. त्यावेळी मी 18 वर्षाचे होते. माझ्या खोलीत ज्या व्यक्तिचे पोस्टर्स मी लावले होते, त्यालाच मला किस करायचे होते.

संजयची मी खूप मोठी फॅन होती आणि त्याच्यासोबत काम करायला मिळण्याचा आनंद खूप मोठा होता. पण त्याच्यासोबत किसींग सीन द्यायचा म्हटल्यावर मी मनातून घाबरले होते.

यावेळी पापा मला सेटवर बाजूला घेऊन गेलेत आणि त्यांनी मला एक कानमंत्र दिला होता. आजही मला त्यांची ती गोष्ट आठवते. पूजा, हा किसींग सीन करताना तुला वल्गर वाटत असेन तर सीनही वल्गरच होईल.

असे नको असेल तर किसींग व लव्ह मेकिंग सीन तुला अतिशय निष्पाप भावासह तेवढ्याच ऊर्जा व सन्मानाने द्यावे लागतील. कारण दृश्यासोबत संवाद गरजेचा असतो, असे पापा मला म्हणाले होते. त्यांचे ते शब्द आयुष्यभरासाठी मला खूप काही शिकवून गेलेत.’

पूजाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिच्या आईचे अनेक फोटो पाहायला मिळतात. हे फोटो पाहिल्यानंतर पूजा तिच्या आईसारखीच दिसते हे लक्षात येते. पूजा तुझ्या आईचा फोटो पाहून एका क्षणासाठी या फोटोत तू कोण आणि तुझी आई कोण हे ओळखणे कठीण जाते असे पूजाचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत असतात.

.