अंकिताला पडला सुशांतचा विसर? ‘पवित्र रिश्ता 2’च्या सेटवरचे फोटो पाहून सुशांतचे चाहते भडकले

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून ख-या प्रसिद्धी मिळाली. 2009 ते 2014 पर्यंत सुरू असलेल्या या मालिकेनं सुशांतच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं.

या मालिकेमुळेच पुढे सुशांतनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यामुळे, सुशांतच्या चाहत्यांसाठी ही मालिक नेहमीच खास असणार आहे. अशात आता या मालिकेचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.  

‘पवित्र रिश्ता 2’मध्ये (Pavitra Rishta2) अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि शहीर शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अंकितानं शूटींगही सुरू केलं आहे. अंकिताचे फॅन्स यामुळे आनंदात आहेत.

पण सुशांतच्या चाहत्यांचा संताप मात्र अनावर झाला आहे. साहजिकच अंकिता पुन्हा एकदा सुशांतच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आली आहे. सुशांतच्या चाहत्यांनी ट्विटरवर अंकिताला ट्रोल करत ‘पवित्र रिश्ता 2’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

सुशांतनं गतवर्षी 14 जूनला कथितरित्या आत्महत्या केली होती. यानंतर अनेकांनी अंकिताला ट्रोल केलं होतं. आता पुन्हा एकदा अंकिता ट्रोल होतेय. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकितानं रडण्याचा नुसता ड्रामा केला 4lअसे त्यांचे म्हणणे आहे.

जेणेकरून भविष्यात तिला सहानुभूती व फायदा मिळेल, असा आरोप सुशांतचे चाहते करत आहेत. सुशांतच्या जाण्याचं अंकिताला कोणतंही दु:ख नाही. पवित्र रिश्ता 2 मध्ये काम करण्यास होकार देणे याचा पुरावा आहे, असंही अनेकांनी म्हटलं आहे.

सुशांतच्या चाहत्यांनी ट्विटरवर अंकिताला ट्रोल करत ‘पवित्र रिश्ता 2’वर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली आहे. ‘पवित्र रिश्ता ’या मालिकेचा प्रेक्षक वर्ग मोठा होता. त्यामुळे, अनेकांना आजही यातील प्रत्येक पात्र लक्षात आहे.

याच मालिकेच्या सेटवर सुशांत व अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण पुढे काही वर्षांनी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. या शोची प्रसिद्धी पाहता निर्मात्यांनी याचा दुसरा सीजन आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

.