आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन पळून लग्न केले होते जितेंद्र च्या ‘या’ अभिनेत्रीने.. घटस्फोटानंतर आता जगतेय असे हलाखीचे आयुष्य..

गेल्या काही दशकात अनेक कलाकारांनी आपल्या भुमिकांनी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. आणि या भूमिका अजरामर झाल्या. आजही अनेक आशा भूमिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. परंतु काही असे कलाकार देखिला आहेत ज्यांची करिअरची सुरवात तर अतिशय भन्नाट झाली पण नंतर काळाच्या ओघात त्यांचा विसर पडला.

आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाली. आधी दाक्षिणात्य चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करून नंतर हळू हळू बॉलिवूड मध्ये परिचीत झाली. मग एक काळ असा आला की ती बॉलिवूड मध्ये टॉप अभिनेत्र्यांपैकी एक मानली जाऊ लागली.

दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीची लोकप्रिय नायिका असलेल्या भानुप्रियाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. नुकताच भानुप्रियाने तिचा 57 वा वाढदिवस साजरा केला. भानुप्रियाने तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे केवळ दक्षिणच नव्हे तर बॉलिवूडमध्येही खूप नाव कमावले. आंध्र प्रदेशातील राजामुंद्री येथे जन्मलेल्या भानुप्रिया यांनी वयाच्या 17 व्या वर्षी अभिनयामध्ये प्रवेश केला.

1983 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेला पेसुंगल’ हा त्याचा पहिला चित्रपट आहे. दाक्षिणात्य चित्रपटात लोकप्रियता मिळाल्यानंतर 90 च्या दशकात भानुने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. आणि मग भानुप्रिया बॉलिवूड ची टॉप अभिनेत्री बनली. भानुप्रियाची चित्रपटात पदार्पणाची कहाणीही खूप रंजक आहे. भानुप्रियाचे खरे नाव मंगा भामा आहे.

भानुप्रियाच्या कुटुंबातआधीपासूनच कोणाचीही चित्रपटाची किंवा अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. ती शाळेत शिकत असताना, एक दिवस भाग्यराजा गुरु तिथे आले. त्याला आपल्या चित्रपटासाठी एक किशोरवयीन मुलगी हवी होती जी नृत्य करू शकेल. त्याने भानुप्रियाची निवड केली, पण एका फोटोशूट दरम्यान त्यांना वाटले की भानु खूपच लहान आहे, त्यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले.

यानंतर, भानु पुन्हा कधीही शाळेत गेली नाही. कारण तिने शाळेत आधीच सगळ्यांना सांगितले होते की ती चित्रपटात दिसणार आहे आणि चित्रपट हातातून गेल्यावर मात्र ती शाळेत गेली तर तिची चेष्टा होईल असे तिला वाटू लागले. त्यामुळे तिने शाळाच सोडली आणि अभिनयाचा ध्यास घेतला. त्यानंतर तिला चित्रपटांमध्ये काम मिळाले आणि यशही मिळाले.

भारतीराजा गुरू यांनी जेव्हा भानुप्रिया चे फोटोशूट बघितले तेव्हा त्यांनी ‘पसीयाडू’ या तमिळ चित्रपटात तिला संधी देण्याचे ठरविले. ती हा चित्रपट करत असताना तिला वंशी गुरूचा ‘सितारा’ आणि त्यानंतर ‘चंद्रंगम’ ची ऑफर आली. प्रथम ‘सितारा’ रिलीज झाला जो एक सुपरहिट चित्रपट ठरला आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्रीय चित्रपटासह राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार जिंकले.

भानुप्रिया ने 1986 मध्ये ‘दोस्ती दुश्मनी’ चित्रपटातुन बॉलिवूड मध्ये एंट्री केली. बॉलीवुड मध्ये त्यांनी आतापर्यंत 150 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे, ज्यात ‘इंसाफ की पुकार’ (1987), ‘खुदगर्ज़’ (1987), ‘मर मिटेंगे'(1988), ‘तमंचा’ (1988), ‘सूर्या’ (एन अवेकनिंग) (1989), ‘दाव पेंच’ (1989), ‘ग़रीबों का दाता’ (1989), ‘कसम वर्दी की’ (1989), ‘जहरीले’ (1990) और ‘भाभी’ (1991) हे चित्रपट सामील आहेत. भानुप्रिया यांनी सुपरस्टार जितेंद्र यांच्यासोबत खूप काम केले आहे.

भानुप्रिया यांनी फिल्म इंडस्ट्रीला 33 वर्षे दिली आणि जवळपास 150 चित्रपट केले. भानुप्रियाचे वैयक्तिक जीवनही खूपच रंजक आहे. एका मुलाखतीत भानुप्रिया म्हणाली की तिला अनिवासी भारतीय आदर्श कौशल खूप आवडले. आदर्श अमेरिकेत राहत असल्याने दोघेही बरेचदा फोनवर बोलत असायचे.

भानुचे आई-वडील दोघांच्या लग्नाविरूद्ध होते. भानुप्रिया यांनी नंतर 14 जून 1998 रोजी कॅलिफोर्नियामध्ये लग्न केले. 5 वर्षांनंतर 2003 मध्ये तिने मुलगी अभिनयाला जन्म दिला. मात्र भानुप्रिया आणि कौशलने लग्नाच्या 7 वर्षानंतर 2005 मध्ये घ-टस्फो-ट घेतला. यानंतर, भानुप्रियाला मुलीचा ताबा मिळाला आणि ती चेन्नईला गेली.

भानु आता एकट्याने त्यांच्या 16 वर्षाच्या मुलीचे संगोपन करत आहेत. भानुप्रियाची एक बहिण ‘शांतीप्रिया’ देखील आहे, जिने तिच्याप्रमाणेच 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये तमिळ, तेलगू आणि ‘सौगंध’ या चित्रपटात काही चित्रपट केले. तथापि, शांतीप्रिया कधीही भानु सारखी प्रसिद्ध झाली नाही.