कामाची गरज असल्याने या सुप्रसिद्ध अभिनेत्री वर आली आता कंडोम विकण्याची वेळ.. जाणून घ्या काय आहे प्रकरण..

 ‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री नुसरत भरूचा आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. आता ती जनहित में जारी या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंंगला सुरूवात होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसा, नुसरत भरूचा वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटात ती बबली गर्लची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना नुसरतचा बोल्ड अंदाज पहायला मिळणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जनहित जारी चित्रपटात नुसरत भरूचा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीचा रोल करणार आहे. नोकरीची गरज असल्याने तिला कंडोम बनवणाऱ्या कंपनीत ‘सेल्स ऍन्ड प्रमोशन एक्‍झिक्‍युटिव्ह’चे काम करायला लागते. आपल्या कामाचा भाग म्हणून तिला मेडिकल स्टोअरपासून इतर अनेक ठिकाणी कंडोम विक्री करत हिंडावे लागते.

अशा ठिकाणी तिला काय-काय अनुभव येतात, याचीच कॉमेडी कहाणी म्हणजे ‘जनहित में जारी’ असणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक राज शांडिल्य आणि नुसरत भरुचाने यापूर्वी ‘ड्रीम गर्ल’साठीही एकत्र काम केले होते.

नुसरत भरुचाचा ‘प्यार का पंचनामा’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत होता. त्यानंतर तिने टाइपकास्ट इमेज तोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘अजीब दास्तांस’ या सिनेमात तिने मोलकरणीची भूमिका करून तिची ‘हॉट बेब’ची इमेज तोडण्याचं काम केलंय.

आत ‘जनहित में जारी’ या आगामी सिनेमात ती कंडोम विकताना दिसणार आहे. या सिनेमाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. या सिनेमात ती एका मेडिकल दुकानात कंडोम विकणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे.

नुसरतने सध्या निवडक सिनेमे स्विकारण्यावर भर दिलेला दिसतोय. तिच्या अलिकडच्या काही सिनेमातून तिने हटके आणि वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यातून तिने आपण दमदार अभिनय करू शकत असल्याचंही दाखवून दिलं आहे. ‘छलांग’मधील शिक्षिकेची भूमिका असो की ‘अजीब दास्तांस’मधील मोलकरीण असो, तिने या भूमिका ताकदीने साकारल्या आहेत

या सिनेमाच्या कथेची कल्पना जेव्हा राज शांडिल्यला सुचली, तेव्हा नुसरतने स्वतःहून हा रोल करण्याची तयारी दर्शवली. या नव्या भूमिकेत नुसरत भरूचा काय कमाल दाखवते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

.