Video : नेहा कक्करची पतीसोबत जोरदार हाणामारी, एकमेकांचे गळे पकडले, झिंज्या उपटल्या

संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. नवरा-बायकोमध्ये लुटूपुटूची भांडणं कुठल्याही वयात होतच असतात. बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर हिच्या लग्नाला 6 महिनेही झाले नाहीत. मात्र पती रोहनप्रीत सिंह याच्यासोबत तिची जोरदार हाणामारी होतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

खुद्द नेहानेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात नेहा आणि रोहनप्रीत हे दोघंही त्वेषाने एकमेकांचे गळे पकडताना दिसत आहेत. घाबरु नका, या सुखी जोडप्याच्या संसारात कुठलाही तडा गेलेला नाही. तर आगामी म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशननिमित्त नेहाने हा धमाकेदार व्हिडीओ शेअर केला आहे.

‘खड तैनू मैं दस्सा’ या म्युझिक व्हिडीओची झलक नेहाने इन्स्टाग्रामवर दाखवली आहे. या व्हिडीओमध्ये दोघांमध्ये तूफान हाणामारी होताना दिसते. अगदी एकमेकांचे गळे पकडून झिंज्या उपटण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचं दिसतं.

चाहत्यांच्या तुफान कमेंट्स

खुद्द नेहानेच हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे ही मस्करी असल्याचं चाणाक्ष चाहते आणि फॉलोअर्सनी लगेच ओळखलं. कोणी हसतानाचे इमोजी टाकून रिअॅक्ट झालं आहे, तर काही फॅन्सनी क्यूट जोडी अशी कमेंट केली आहे. एका इन्स्टाग्राम युजरने तर लग्नानंतरची हालत असं म्हणत हशा पिकवला. अवघ्या काही तासात या व्हिडीओला सहा लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते.

पहा विडिओ :

नेहाचा नवीन म्युझिक व्हिडीओ

‘तुमची नेहू आणि माझ्या रोहनप्रीतचे गाणे ‘खड तैनू मैं दस्साचे पहिले पोस्टर, फर्स्ट लूक’ असं लिहित नेहा कक्करने काही दिवसांपूर्वी फोटो शेअर केला होता. या पोस्टरमध्ये दोघं ब्राईट रंगाच्या ड्रेसमध्ये फुटबॉल ग्राऊंडवर उभे दिसत आहेत. रोहनप्रीतच्या हातात फुटबॉल आहे, तर पोस्टरवर नेहा कक्कड़ Vs रोहनप्रीत सिंह असंही लिहिलं आहे.

प्रेग्नन्सी फोटोवरुनही धुमाकूळ

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांनी 24 ऑक्टोबरला दिल्लीत लग्न केलं. तर 18 डिसेंबरला बेबी बंप फ्लॉन्ट करत पती रोहनप्रीतसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला होता. या फोटोसोबत नेहाने ‘ख्याल रखया कर’ असं कॅप्शन दिलं होतं.

त्यामुळे नेहा आणि रोहनप्रीतच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी या चर्चेला पूर्णविराम देत नेहाने तिच्या गाण्याचं पोस्टर रिलीज केलं होतं. त्यामुळे नेहा प्रेग्नेंट नसून फोटो शेअर करणं हे तिच्या ‘ख्याल रखया कर’या गाण्याचं प्रमोशन असल्याचं स्पष्ट झालं होतं.