80च्या दशकातल्या या अविवाहित अभिनेत्रीला आता करायचाय रणबीर कपूर सोबत रोमान्स..

म्हणायला नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी कधीच साठी ओलांडलीये. पण त्यांचा बोल्डनेस आजही कायम आहे. स्वभावाने, विचाराने, आचरणाने ‘बोल्ड’ असलेल्या नीना सुरूवातीपासून आपल्या अटींवर जगल्या. 8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली.

यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा.

आणि त्यांनी त्यांचा निर्णय पूर्ण करून दाखवला आणि मसाबाचा जन्म झाला. आता याच नीनांनी एक इच्छा बोलून दाखवलीये. होय, ती काय तर रणबीर कपूरसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याची.

आपल्या बॉलिवूडचे हिरो पडद्यावर स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या हिरोईनसोबत रोमान्स करताना दिसतात. वयाने मोठ्या हिरोईनसोबत काम करण्यास कोणताही हिरो तयार होत नाही. नेमक्या याच मुद्यावर नीना यांनी स्वत:चे मत मांडले आहे.

शाहरूख खान, सलमान खान त्यांच्यापेक्षा 25 वर्षे लहान हिरोईनसोबत रोमान्स करू शकतात. मग मी रणबीर कपूरसोबत ऑनस्क्रीनरोमान्स का करू शकत नाही? असा सवाल त्यांनी ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत केला

मी शाहरूख वा हृतिक रोशनच्या अपोझिट काम का करू शकत नाही? मी रणबीर कपूर म्हणत नाहीये. मी इतकी मूर्खही नाहीये. मात्र शाहरूख, हृतिक यांनी  स्वत:पेक्षा 25 वर्षांनी लहान हिरोईनसोबत पडद्यावर रोमान्स केला आहे.

हाच नियम मला लागू केला तर, मी सुद्धा रणबीर कपूरसोबत रोमान्स करू शकते. अर्थात आपल्या देशात हे प्रत्यक्षात व्हायला बराच वेळ लागेल. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये असा भेदभाव नाही, असे त्या म्हणाल्या. 

4 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या नीना यांनी ‘खानदान’ या टीव्ही मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. नीना गुप्ता आपल्या पर्सनल लाईफला घेऊन देखील तितक्याच चर्चेत राहिल्या.

.