घटस्फोट न देताच आपल्या पत्नी पासून दूर राहतात नाना पाटेकर.. या अभिनेत्रीमुळे आली ही वेळ-

हिंदी असो किंवा मराठी मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला रसिकांची पसंती मिळाली. एक असामान्य व्यक्तिमत्त्व कधी हिरो बनण्याचा विचार न करता अभिनयत्रेत्रात पाऊल ठेवलं. चॉकलेटी इमेज, सुंदर चेहरा नसतानाही सिनेसृष्टीतच नाहीतर रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं.

रुपेरी पडद्यावर एंग्री मॅन वाटणारे नाना पाटेकर कधी काळी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळेही चर्चेत राहिले. नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी ‘अग्निसाक्षी’ सिनेमात एकत्र काम केले होते. सिनेमात काम करता करता दोघांमध्ये जवळीक वाढु लागली.दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही.

नाना-मनिषा यांच्या अफेअरमुळे अग्निसाक्षी सिनेमाही हिट ठरला. दोघांची ऑनस्क्रीन जोडी रसिकांच्याही प्रचंड पसंतीस पडली होती. या सिनेमानंतर दोघांची जोडीही हिट ठरली. दोघांनाही अनेक सिनेमाच्या ऑफर यायला लागल्या. नानांसाठी मनिषा फारच पझेसिव होती.

नानांचे त्यांच्या कोस्टार सोबत जास्त मिळून मिसळून वागणे मनिषाला अजिबात आवडायचे नाही. मनिषा कोईरालाचे नाना यांच्याशी इतर अभिनेत्रींवरुन नेहमी खटके उडायचे. मनिषा प्रमाणे नानाही खूप पझेसिव्ह होते.सिनेमाच्या शूटिंगसाठी मनीषाचे तोकडे कपडे घालणे नाना यांना अजिबात पसंत नव्हते. असे कपडे घालायला नाना मनिषाला नाना नेहमीच नकार द्यायचे.

मनिषा कोईराला दोघांच्या या नात्याला घेवून खूप सीरियस होती.दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. मनिषाला त्यांच्याशी लग्न करायचे होते. अनेकदा मनिषाने नाना पाटेकर यांना ही गोष्ट सांगितली,मात्र नाना यांनी या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष केले.

दोघांचेही अफेअर सुरू असताना नाना पाटेकर विवाहीत होते. नीलाकांती पाटेकर यांच्यासोबत नानाचे वैवाहिक जीवन सुरळीत नसल्याच्याही चर्चा रंगल्या. लग्न झाले असतानाही दोघेही वेगवेगळे राहायचे. मनिषाने नाना यांच्यावर पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्यासाठी दबाव दिला पण नाना काहीही करुन पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हते.

नानाच्या म्हणण्यानुसार, नीलू एका बँकेत अधिकारी होत्या आणि महिन्याला 2500 रुपये कमावत असत. त्यावेळी मला एका शोसाठी 50 रुपये मिळत असत. मी एका महिन्यात 15 शो केले तर माझी कमाई 750 रुपये असायची. म्हणजेच माझे आणि नीलू यांचे मिळून महिन्याचे 3250 रुपये उत्पन्न होते, जे आमच्या गरजेपेक्षा जास्त होते.

नाना पाटेकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांची पत्नी नीलू सिनेमापासून दूर राहिली. ते म्हणतात, “तिचा एकमेव चित्रपट ‘आत्मा विश्वास’ होता, ज्याचे दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले होते. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. नीलूचे वजन वाढत्या वयानुसार वाढले आणि ती चित्रपटांपासून दूर गेली. नाना असेही म्हणते की त्याच्याकडे होते नीलूला वजन कमी करण्याचा सल्लाही दिला.

एका मुलाखतीत नानाने सांगितले होते- माझे वयाच्या 27 व्या वर्षी लग्न झाले. जेव्हा तो 28 वर्षांचा झाला, तेव्हा त्याने त्याचे वडील गमावले आणि अडीच वर्षानंतर माझा मोठा मुलगा जगाचा निरोप घेऊन गेला. जन्मापासूनच त्याचे ओठ का-पले गेले होते. या बरोबरच त्याच्याबरोबर इतरही काही समस्या होत्या.

थोरल्या मुलाच्या निधनानंतर नाना पाटेकर पूर्णपणे तुटले होते. ते कोणाशीही बोलत नव्हते. तथापि, काही काळानंतर नाना पाटेकरचा दुसरा मुलगा मल्हारचा जन्म झाला तेव्हा आनंद त्याच्या आयुष्यात परतला.

नानाचा मुलगा मल्हारला अभिनयात करियर करायचं होतं. प्रकाश झा मल्हारला आपल्या चित्रपटासह लॉन्च करणार होते, पण प्रकाश झा आणि नाना पाटेकर यांच्यात झालेल्या क्षुल्लक वादामुळे हे शक्य झाले नाही.

नानाने मल्हारला प्रकाश झा यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता. तथापि, नंतर मल्हारने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा जॉइन केले आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली.

.