विवाहित असूनही 20 वर्षे लहान अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता नाना पाटेकर.. पण पत्नीला प्रकरण कळताच झालं असं काही..

हिंदी असो किंवा मराठी मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला रसिकांची पसंती मिळाली. एक असामान्य व्यक्तिमत्त्व कधी हिरो बनण्याचा विचार न करता अभिनयत्रेत्रात पाऊल ठेवलं. चॉकलेटी इमेज, सुंदर चेहरा नसतानाही सिनेसृष्टीतच नाहीतर रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं.

रुपेरी पडद्यावर एंग्री मॅन वाटणारे नाना पाटेकर कधी काळी त्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळेही चर्चेत राहिले. नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी ‘अग्निसाक्षी’ सिनेमात एकत्र काम केले होते. सिनेमात काम करता करता दोघांमध्ये जवळीक वाढु लागली.दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही.

नाना-मनिषा यांच्या अफेअरमुळे अग्निसाक्षी सिनेमाही हिट ठरला. दोघांची ऑनस्क्रीन जोडी रसिकांच्याही प्रचंड पसंतीस पडली होती. या सिनेमानंतर दोघांची जोडीही हिट ठरली. दोघांनाही अनेक सिनेमाच्या ऑफर यायला लागल्या. नानांसाठी मनिषा फारच पझेसिव होती.

नानांचे त्यांच्या कोस्टार सोबत जास्त मिळून मिसळून वागणे मनिषाला अजिबात आवडायचे नाही. मनिषा कोईरालाचे नाना यांच्याशी इतर अभिनेत्रींवरुन नेहमी खटके उडायचे. मनिषा प्रमाणे नानाही खूप पझेसिव्ह होते.सिनेमाच्या शूटिंगसाठी मनीषाचे तोकडे कपडे घालणे नाना यांना अजिबात पसंत नव्हते. असे कपडे घालायला नाना मनिषाला नाना नेहमीच नकार द्यायचे.

मनिषा कोईराला दोघांच्या या नात्याला घेवून खूप सीरियस होती.दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. मनिषाला त्यांच्याशी लग्न करायचे होते. अनेकदा मनिषाने नाना पाटेकर यांना ही गोष्ट सांगितली,मात्र नाना यांनी या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष केले.

दोघांचेही अफेअर सुरू असताना नाना पाटेकर विवाहीत होते. नीलाकांती पाटेकर यांच्यासोबत नानाचे वैवाहिक जीवन सुरळीत नसल्याच्याही चर्चा रंगल्या. लग्न झाले असतानाही दोघेही वेगवेगळे राहायचे. मनिषाने नाना यांच्यावर पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्यासाठी दबाव दिला पण नाना काहीही करुन पत्नीला घटस्फोट देण्यासाठी तयार नव्हते.

मनिषाला नाना यांच्या अशा वागण्याचा संताप येत होता.एक दिवस असा आला जेव्हा नाना आणि मनिषा यांच्यात कायमचा दुरावा निर्माण झाला. नाना यांना मनिषाने एका रुममध्ये अभिनेत्री आयेशा झुल्कासोबत रंगेहात पकडले होते. दोघांना एकत्र पाहून मनिषा फार दुखावली गेली होती.

आयेशा आणि नाना दोघांनाही एकत्र पाहून मनिषा फार संतापली. दोघांना पाहून मनीषाने प्रचंड गोंधळ घातला. नाना पाटेकर यांनी मनिषाला कसेबसे शांत केले. अखेर नानाच्या या वागणुकीमुळे हैरान होवून मनिषाने नानापासून ब्रेक करत दूर जाणेच पसंत केले.

मनिषा कोईरालासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नाना आयेशा झुल्काच्या प्रेमात पडले. दोघांनीही लिव-इन मध्ये राहण्यास सुरुवात केली होती पण नानाच्या तापट स्वभावामुळे आयेशा आणि नाना यांचे नातेही फार काळ काही टिकले नाही.

.