Mouni Roy झाली Oops मुव्हमेंट चा शिकार, कॅमेऱ्यात कैद झाले नको ते दृश्य..

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मौनी रॉय (Mouni Roy) एक डिझाइनर ड्रेस घातला आहे. हा ड्रेस ती कॅमेऱ्यापासून वाचवताना दिसत आहे. धावत जाऊन गाडीत बसताना चुकून मौनी रॉय Oops मुव्हमेंटची शिकार झाली आहे. 

या व्हिडिओत मौनी रॉय आपल्या चाहत्यांसोबत बोलत आहे. अगदी पापाराजीला देखील पोझ देताना दिसतेय. मात्र या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, मौनी रॉय या कपड्यात अजिबात कन्फर्टेबल नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. तिच्या या कपड्यांवरून तिला ट्रोल करण्यात आलं. आपल्याला सांभाळायला येत नाही तर असे कपडे का घालता?

एका बाजूला केसांनी लपवलं तर दुसऱ्या बाजूला हाताने. आपल्या कपड्यांबद्दल एवढंच वाटतं तर मग घालतात कशाला. तर दुसऱ्या युझरने म्हटलं की, कपडे सांभाळता येत नाही तर घालता कशाला? ही आपली संस्कृती आहे का?

मौनी रॉय (Mouni Roy) च्या आऊटफिटवर लोकांनी प्रश्न विचारले. अगदी कमेंट सेक्शनमध्ये संस्कृती बिघडवल्याचा आरोप करण्यात आला. मौनी रॉयने टीव्ही मालिकेत काम केलं आहे. आता ती मोठ्या पडद्यावर फोकस करत आहे.

मौनीने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली मालिका ‘क्यों सास भी कभी बहु थी’मधून केली होती. मौनीला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. शालेय शिक्षण मौनीने पश्चिम बंगालमधून घेतले. यानंतर तिने दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रेजुएशन पूर्ण केले.

तिने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. पहिल्यांदा रन सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती. 2018मध्ये अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या ‘ब्रम्हास्त्र’ सिनेमात दिसणार आहे.